मुंबई- छोट्या पडद्यावरील लोकप्रिय जोडी आणि ही अजूनही चाहत्यांची आवडती जोडी आहे. सिद्धार्थने भलेही या जगाचा निरोप घेतला तरीही शहनाज आणि सिद्धार्थ चाहत्यांमध्ये सिडनाज म्हणून लोकप्रिय आहेत. २ सप्टेंबर रोजी सिद्धार्थचं हृदयविकाराच्या झटक्याने निधन झालं. सिद्धार्थच्या जाण्याचा सगळ्यात मोठा धक्का बसला तो म्हणजे शहनाज गिल हिला. सिद्धार्थच्या मृत्यूनंतर शहनाज पूर्णपणे तुटली होती. आता शहनाजने तिच्या लाडक्या सिद्धार्थला श्रद्धांजली म्हणून एक गाणं प्रदर्शित केलं आहे. नुकतीच शहनाजने घोषणा करत या गाण्यातून ती सिद्धार्थला ट्रिब्यूट देणार असल्याची माहिती दिली होती. 'बिग बॉस १३' चा विजेता ठरलेला सिद्धार्थ अचानक शहनाजला सोडून गेल्याने तिची काय अवस्था झाली हे या गाण्यात दिसत आहे. शहनाज आणि सिद्धार्थ यांची पहिली भेट, त्यांची मैत्री, त्यांचं प्रेम सगळं काही बिग बॉसच्या घरात झालं होतं. ते एकमेकांवर रागवायचे, एकमेकांना मनवायचे. ते क्षण शहनाज आणि सिद्धार्थसाठी खास होते. त्यांचे हेच खास क्षण या गाण्यामध्ये पुन्हा दाखवण्यात आले आहेत. गाणं पाहताना सिद्धार्थ सतत शहनाजच्या बाजूला असल्याचा भास होतो. हे गाणं शहनाजने गायलं असून गाण्याचे बोल ऐकून चाहत्यांच्या डोळ्यात देखील पाणी आलं आहे. चाहत्यांनी व्हिडिओवर कमेंट करत त्यांच्या भावना व्यक्त केल्या आहेत. व्हिडिओच्या निमित्ताने आज पुन्हा त्यांना सिद्धार्थला अनुभवता आलं यासाठी त्यांनी शहनाजचे आभार मानले आहेत. अनेकांनी शहनाजच्या दुःखात तिला धीर देण्याचा प्रयत्न केला आहे. तर अनेकांनी सिद्धार्थसाठीचं त्यांचं प्रेम दाखवलं आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3mnLDHb