Full Width(True/False)

iQoo 8 आणि iQoo 8 Legend स्मार्टफोन्स लवकरच होणार भारतात लाँच, पाहा फीचर्स

नवी दिल्ली : लवकरच भारतात आणि या दोन स्मार्टफोन्सला भारतात लाँच करणार आहे. या दोन्ही फोन्सला ऑगस्ट महिन्यात चीनमध्ये लाँच केले होते. मात्र, कंपनीने अद्याप अधिकृत माहिती दिलेली नाही. दोन्ही फोन्समध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. याशिवाय हाय-रिफ्रेश रेटसह येणारा डिस्प्ले मिळेल. वाचा: रिपोर्टनुसार, iQoo 8 आणि iQoo 8 Legend ला या महिन्याच्या अखेरीस अथवा नोव्हेंबरच्या सुरुवातीला भारतात लाँच केले जाईल. कंपनी लवकरच लाँचिंग टीझर जारी करेल. iQoo 8 चीनमध्ये सुरुवाती किंमत ३,७९९ (जवळपास ४३,६०० रुपये) आहे. तर iQoo 8 Pro ची सुरुवाती किंमत ४,९९९ युआन (जवळपास ५७,३०० रुपये) आहे. iQoo 8 चे स्पेसिफिकेशन iQoo 8 मध्ये अँड्राइड ११ आधारित Origin OS १.० दिले आहे. फोनमध्ये ६.५६ इंच फुल एचडी प्लस एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२३७६ पिक्सल, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि १० बिट कलर सपोर्ट मिळतो. फोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८८८ प्रोसेसरसह १२ जीबी LPDDR५ रॅम आणि २५६ जीबी UFS ३.१ स्टोरेज मिळते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. यात ४८ मेगापिक्सल IMX५९८ सेंसर प्रायमरी लेंस मिळते. फ्रंटला सेल्फीसाठी १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. iQoo 8 मध्ये ४३५० एमएएचची बॅटरीसह १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळतो. कनेक्टिव्हिटीसाठी यात ५जी, ड्यूल बँड वाय-फाय, एनएफसी, जीपीएस, ब्लूटूथ वी५.२ आणि यूएसबी टाइप-सी पोर्टचा सपोर्ट मिळतो. फोनमध्ये इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. iQoo 8 Pro (iQoo 8 Legend) चे स्पेसिफिकेशन iQoo 8 Pro मध्ये ६.७८ इंच २के एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १४४०x३२०० पिक्सल आहे. फोनमध्ये १२० हर्ट्ज रिफ्रेश रेट डिस्प्ले मिळतो. यात स्नॅपड्रॅगन ८८८ प्लस प्रोसेसर, ग्राफिक्ससाठी एट्रेनो ६६० जीपीयू, १२ जीबीपर्यंत LPDDR५ रॅम आणि ५१२ जीबी स्टोरेज मिळते. फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट दिला असून, यात ५० मेगापिक्सल IMX७६६V सेंसर प्रायमरी लेंस मिळते. दुसरा ४८ मेगापिक्सल आणि तिसरा १६ मेगापिक्सल सेंसर आहे. सेल्फीसाठी यात १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. यात १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४५०० एमएएचची बॅटरी मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2XOMveC