Full Width(True/False)

JioPhone Next खरेदी करण्याआधी जाणून घ्या या अटी, अन्यथा होऊ शकते नुकसान

नवी दिल्ली : ने अखेर आपल्या स्वस्त मेड इन इंडिया JioPhone Next च्या किंमत आणि फीचर्सवरून पडदा हटवला आहे. फोनची किंमत ६,४९९ रुपये आहे. फोन ४ नोव्हेंबरला दिवाळापासून खरेदी करता येईल. मात्र, खरेदी करण्यापूर्वी काही गोष्टी लक्षात ठेवणे गरजेचे आहे, अन्यथा नुकसान होऊ शकते. वाचा: तुमचे बजेट कमी असेल तर तुम्ही या फोनला १,९९९ रुपयांच्या डाउन पेमेंटवर खरेदी करू शकता. ग्राहक बाकी राहिलेली रक्कम १८ अथवा २४ महिन्यांच्या ईएमआयवर भरू शकतील. JioPhone Next च्या अटी व नियम मध्ये दोन सिम स्लॉट दिले आहे. यातील एका स्लॉटमध्ये SIM वापरावेच लागेल व दुसऱ्या स्लॉटमध्ये इतर कंपनीचे सिम वापरू शकते. तसेच, डेटा कनेक्शन केवळ जिओ सिमवरच मिळेल. तसेच, जिओचे रिचार्ज करावे लागेल. म्हणजे, जिओशिवाय इतर कंपनीचे सिम केवळ कॉलिंगसाठी असेल. JioPhone Next चे स्पेसिफिकेशन्स JioPhone Next स्मार्टफोनमध्ये ५.४५ इंच HD टच-स्क्रीन दिली असून, सोबत कॉर्निंग गोरिल्ला ग्लास-३ प्रोटेक्शन मिळते. फोन २ जीबी रॅम आणि ३२ जीबी स्टोरेजसह येतो. स्टोरेजला एसडी कार्डने ५१२ जीबीपर्यंत वाढवू शकता. फोनमध्ये ६४ बिट्स CPU सह क्वाड कोर क्वालकॉम २१५ चिपसेट सपोर्ट दिला आहे. JioPhone Next मध्ये १३ मेगापिक्सलचा रियर कॅमेरा दिला आहे. तर सेल्फीसाठी ८ मेगापिक्सलचा कॅमेरा मिळतो. यात ३५०० एमएएचची बॅटरी दिली आहे. सिंगल चार्जमध्ये ही बॅटरी ३६ तास टिकेल. यात Hotspot कनेक्टिव्हिटी देखील मिळते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3msE6qM