नवी दिल्ली : ने आपला नवीन OnePlus 9RT ला लाँच केले आहे. या फोनमध्ये ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला असून, याचा मुख्य कॅमेरा ५० मेगापिक्सल आहे. यात एमोलेड डिस्प्ले असून, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आहे. फोन ऑक्टा-कोर Qualcomm Snapdragon 888 SoC चिपसेट सपोर्टसह येतो. वाचाः OnePlus 9RT ची किंमत च्या ८ जीबी रॅम + १२८ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,२९९ CNY (जवळपास ३८,६०० रुपये), ८ जीबी रॅम + २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,४९९ CNY (जवळपास ४०,९०० रुपये) आहे. फोनच्या १२ जीबी रॅम आणि २५६ जीबी स्टोरेज व्हेरिएंटची किंमत ३,७९९ CNY (जवळपास ४४,४०० रुपये) आहे. फोनची विक्री १९ ऑक्टोबरपासून सुरू होणार असून, लाँच ऑफर अंतर्गत १२०० रुपये डिस्काउंट मिळेल. OnePlus 9RT स्पेसिफिकेशन्स OnePlus 9RT स्मार्टफोन ड्यूल-सिम (Nano) सपोर्टसह येतो. हा फोन अँड्राइड ११ आधारित ओप्पोच्या ColorOS ऑपरेटिंग सिस्टम काम करतो. यात ६.६२ इंच FHD+ डिस्प्ले पॅनेल दिला असून, याचे रिझॉल्यूशन (१,८०x२४०० पिक्सल) आहे. फोनमध्ये Samsung E4 एमोलेड डिस्प्ले आहे. तर याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. याचा पीक ब्राइटनेस १,३०० निट्स, रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज आणि टच सँपलिंग रेट १२०० हर्ट्ज आहे. OnePlus 9RT स्मार्टफोनमध्ये ऑक्टाकोर क्वालकॉम स्नॅपड्रॅगन चिपसेट सपोर्ट मिळतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सपोर्ट दिला असून, याचा प्रायमरी कॅमेरा ५० मेगापिक्सल, दुसरा १६ मेगापिक्सल आणि २ मेगापिक्सल मॅक्रो लेंस आहे. फोन ड्यूल एलईडी फ्लॅश सपोर्टसह येईल. याद्वारे ४के व्हिडिओ रेकॉर्डिंग करू शकता. फ्रंटला Sony IMX४७१ चा १६ मेगापिक्सल कॅमेरा दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी ५जी, ४जी LTE, वाय-फाय ६, ब्लूटूथ वी५.२, GPS/ A-GPS, NFC आणि एक यूएसबी टाइप-सी पोर्ट दिला आहे. पॉवरसाठी ६५टी Warp चार्ज सपोर्टसह ४५०० एमएएच ड्यूल सेल बॅटरी सपोर्ट मिळतो. OnePlus 9RT स्मार्टफोनचे डायमेंशन १६२.२x७४.६x८.२९एमएम व वजन १९८.५ ग्रॅम आहे. वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3FLiyNx