नवी दिल्ली : विवोने आपल्या स्मार्टफोन्सची रेंज वाढवत S सीरिजमधील नवीन डिव्हाइस ला लाँच केले आहे. या फोनला चीनमध्ये लाँच केले असून, याची किंमत २,३९९ युआन (जवळपास २८ हजार रुपये) आहे. फोनचे प्री-सेल २० ऑक्टोबरपासून सुरू होईल. यात ४४ वॉट फास्ट चार्जिंग आणि ६४ मेगापिक्सल ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला आहे. स्मार्टफोनविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Vivo S10e चे फीचर आणि स्पेसिफिकेशन फोनमध्ये ६.४ इंच फुल एचडी+ एमोलेड डिस्प्ले दिला असून, याचे रिझॉल्यूशन १०८०x२४०० पिक्सल आहे. याचा आस्पेक्ट रेशियो २०:९ आहे. यात वॉटरड्रॉप नॉच डिझाइन दिले असून, फोन वॉटरकलर, हेज आणि ग्लास ब्लॅक रंगात येतो. ८ जीबी रॅम आणि २५६ जीबी इंटर्नल स्टोरेजसह येणाऱ्या या फोनमध्ये मीडियाटेक डायमेंसिटी ९०० चिपसेट दिला आहे. फोटोग्राफीसाठी एलईडी फ्लॅशसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप मिळतो. यात ६४ मेगापिक्सल प्रायमरी कॅमेऱ्यासह ८ मेगापिक्सल अल्ट्रा वाइड अँगल लेंस आणि २ मेगापिक्सल डेप्थ सेंसर दिला आहे. सेल्फीसाठी ३२ मेगापिक्सलचा फ्रंट कॅमेरा मिळतो. यात ४४ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह ४००० एमएएचची बॅटरी दिली आहे. फोन अँड्राइड ११ आधारित Origin OS १.० वर काम करतो. यात इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट सेंसर दिला आहे. कनेक्टिव्हिटीसाठी यात ड्यूल बँड वाय-फाय, ब्लूटूथ ५.१, जीपीएस, ५जी आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखे फीचर मिळतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3jf6gn1