Full Width(True/False)

Nokia चा पहिला टॅबलेट Nokia T20 भारतात लवकरच होणार लाँच, हे आहेत फीचर्स

नवी दिल्लीः फिनलँडची कंपनी नोकिया डिव्हाइसेज बनवते. कंपनीने आपला पहिला टॅबलेट लाँच केला आहे. हे टॅबलेट आता भारतात येत आहे. रिपोर्टच्या माहितीनुसार, ई-कॉमर्स वेबसाइट फ्लिपकार्ट ने Nokia T20 टॅबलेटला सेक्शनमध्ये लिस्ट करण्यात आला आहे. Nokia T20 च्या नावाने याला लाँच केले जावू शकते. माय स्मार्ट प्राइस वेबसाइटने फ्लिपकार्ट वर Nokia T20 ला स्पॉट केले आहे. हा नोकियाचा पहिला टॅबलेट आहे. त्यामुळे कंपनीला वाटतेय की, याला लोकांची पसंती मिळेल तसेच याची विक्री जास्त होण्याची अपेक्षा आहे. फ्लिपकार्ट सुद्धा Nokia T20 टॅबलेट लाँचला फेस्टिव्ह बिगेस्ट लाँच सांगत आहे. परंतु, नोकियाचा हा टॅबलेट कधी लाँच होणार आहे याची माहिती अद्याप समोर आली नाही. कंपनीने अजून लाँच डेट संबंधी अजून काहीही सांगितले नाही. परंतु, अजूनही फ्लिपकार्टवर Nokia T20 टॅबलेटची लिस्टिंग दिसत नव्हती. कंपनीने याला हटवले आहे. याचा Nokia T20 टॅबलेटसाठी फ्लिपकार्टने डेडिकेटेड पेज बनवले आहे. या ठिकाणी टॅबलेटच्या स्पेसिफिकेशन्स लिस्ट आहे. Nokia T20 टॅबलेटच्या फीचर्स आणि स्पेसिफिकेशन्स मध्ये यात १०.४ इंचाचा २के डिस्प्ले दिली आहे. हे टॅबलेट्स Unisoc 12nm Tiger T610 चिपसेट वर चालतो. Nokia T20 टॅबलेट मध्ये ३ जीबी आणि ४ जीबी रॅमचा ऑप्शन मिळेल. यासोबतच ३२ जीबी आणि ६४ जीबीचे स्टोरेज दिले आहे. या टॅबलेट मध्ये मायक्रो एसडी कार्ड चा सपोर्ट दिला आहे. Nokia T20 टॅबलेट मध्ये 8200mAh ची बॅटरी दिली जाणार आहे. हे टॅब अँड्रॉयड ११ वर चालतो. परंतु, आगामी काळात अँड्रॉयड १२ चे अपडेट मिळू शकेल. वाचा: वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GxshHz