नवी दिल्ली : Redmi कंपनीतर्फे Redmi Watch 2 आणि Redmi Note 11 Series सह Redmi Earbuds देखील ग्राहकांसाठी लाँच करण्यात आले आहे. कंपनीचे हे नवीन TWS Earbuds उत्कृष्ट वैशिष्ट्ये आणि दीर्घ बॅटरी लाईफ देतात. तुम्हाला च्या किंमत आणि वैशिष्ट्यांबद्दल सविस्तर जाणून घ्यायचे असेल तर ही विशेष माहिती तुमच्यासाठी. पाहा डिटेल्स. वाचा: Redmi Buds 3 Lite : वैशिष्ट्ये हे नवीन Redmi Earbuds इन-इअर डिझाइनसह लाँच केले गेले आहेत, कंपनीने या डिझाइनला अनोखे कॅट-इअर डिझाइन असे नाव दिले आहे. ते युजर्सना स्थिर फिट ऑफर करतील. असा दावा कंपनीतर्फे करण्यात आला आहे. नवीन Redmi Buds 3 LiteTWS इअरबड्स ब्लूटूथ आवृत्ती ५.२ कनेक्टिव्हिटी आणि यूएसबी टाइप-सी चार्जिंग सपोर्ट आणि टच कंट्रोल बटणांसह सुसज्ज आहेत. कंपनीचा दावा आहे की हे बड्स चार्जिंग केससह १८ तासांपर्यंत टिकू शकतात. Redmi Buds 3 Lite किंमतीबद्दल बोलायचे झाले तर, Redmi Buds 3 Lite ची किंमत CNY ९९ (सुमारे १,२०० रुपये) निश्चित करण्यात आली आहे. केवळ Buds च नाही, तर Xiaomi ने Redmi Note 11 सीरीज अंतर्गत ग्राहकांसाठी तीन नवीन Redmi मोबाईल लाँच केले आहेत. ज्यात नवीन Redmi Watch 2, Redmi Note 11, Redmi Note 11 Pro आणि Redmi Note 11 Pro Plus चा समावेश आहे. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nEQrYb