नवी दिल्ली : अनेकदा आपल्याला वरील खासगी मेसेज इतरांपासून लपवायचे असतात. असे मेसेज लपवण्यासाठी आता व्हॉट्सअॅपने अर्काइव्हमध्ये सुविधा दिली आहे. WhatsApp मध्ये अनावश्यक संवाद बंद करणे आणि चॅटला मेन लिस्टमधून गायब करण्यासाठी खास सुविधा मिळते. Archive फोल्डरद्वारे यूजर्सला व्यक्ती अथवा ग्रुपला ब्लॉक न करता दूर्लक्ष करता येते. वाचा: याआधी WhatsApp मध्ये नवीन मेसेज येईपर्यंत अर्काइव्ह चॅट मेन लिस्टमधून गायबर होते असे. मात्र, जुलैमध्ये कंपनीने नवीन अर्काइव्ह चॅट सेटिंग्सला रोलआउट केले आहे. यामुळे नवीन मेसेज आल्यानंतर देखील अर्काइव्ह चॅट म्यूटच राहील. तुम्ही स्वतः अनअर्काइव्ह करत नाही तोपर्यंत हे मेसेज तुम्हाला मेन लिस्टमध्ये दिसणार नाही. कायमस्वरूपी लपवा चॅट नवीन सेटिंग्समध्ये अनावश्यक चॅटला मेन लिस्टमधून अर्काइव्ह करून लपवता येते. जोपर्यंत यूजर्स रिप्लाय करत नाही, तोपर्यंत अर्काइव्ह चॅट्सचे नॉटिफिकेशन येणार नाही. ही सेटिंग पर्सनल व ग्रुप चॅट दोन्हीसाठी लागू असेल. चॅट कसे लपवू शकता ते जाणून घेऊया.
- सर्वात प्रथम WhatsApp उघडा. आता जे चॅट अर्काइव्ह करायचे आहे ते निवडा.
- वरच्या बाजूला पिन, म्यूट आणि अर्काइव्ह असे पर्याय दिसतील. त्यातील अर्काइव्ह बटनवर क्लिक करा.
- अर्काइव्ह सेक्शन आता चॅट फीडमध्ये दिसेल. तुम्ही कोणत्याही वेळी हे लपवलेले चॅट पाहू शकता.
- यूजर्स चॅटवर क्लिक करून कधीही Unarchive चा पर्याय निवडू शकतात.
- तुम्हाला सर्व चॅट अर्काइव्ह करायचे असल्यास More > Settings वर टॅप करा. आता Chats > Chat History > Archive all chats वर टॅप करा.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D9j1XU