नवी दिल्ली : ने भारतीय बाजारपेठेत वायरलेस सबवूफरसह आपला नवीन साउंडबार Pure Sound 102 लाँच केला आहे. Pure Sound 102 साउंडबार आधुनिक शैली आणि मल्टीमीडिया वैशिष्ट्यांसह सादर करण्यात आला आहे. स्मार्ट टीव्हीची वाढती बाजारपेठ लक्षात घेऊन Portronics ने हा साउंडबार सादर केला आहे. त्याची आकर्षक युरोपियन रचना फार कमी जागा व्यापते. वाचा: हे १६० W शक्तिशाली सिस्टम आउटपुट आणि ३D सराउंडसह वायरलेस सबवूफर आहे. हा साउंडबार २.१ पर्यंत चॅनेलला सपोर्ट करतो. आणि स्पष्ट आणि प्रीमियम आवाज देतो. शिवाय, तुम्ही यात सहज रिमोट कंट्रोल ऍक्सेसद्वारे प्ले, पॉज, व्हॉल्यूम, बास, ट्रेबल इत्यादी अनेक संगीत मोडचा आनंद घेऊ शकता. उत्तम कनेक्टिव्हिटीसाठी यात ब्लूटूथ ५.० आहे. यासोबत कनेक्टिव्हिटीसाठी USB ड्राइव्ह, ३.५ MM ऑक्स-इन, ऑप्टिकल इनपुट पोर्ट आणि HDMI सारखे पर्यायही उपलब्ध आहेत. Portronics Pure Sound 102’ आकर्षक काळ्या रंगात मॅट फिनिशसह ८,९९९ च्या किमतीत उपलब्ध असून हे १२ महिन्यांच्या वॉरंटीसह येते. कंपनीच्या अधिकृत वेबसाइट व्यतिरिक्त, Amazon.in आणि इतर आघाडीच्या ऑनलाइन आणि ऑफलाइन स्टोअरवर ते उपलब्ध आहे. काही दिवसांपूर्वी, Portronics ने भारतात "डॅश स्पीकर" लाँच केला, जो ४० W स्पीकर आहे. "डॅश स्पीकर" चे वैशिष्ट्य म्हणजे ते USB आणि ३.५ mm ऑक्स कनेक्टिव्हिटीसह येते. याशिवाय यात वायरलेस कराओके माइकचाही सपोर्ट आहे. तसेच या स्पीकरमध्ये ऑडिओ रेकॉर्डिंग फीचरही देण्यात आले आहे. हा स्पीकर खास पार्टी प्रेमींसाठी सादर करण्यात आला आहे. डॅश स्पीकर ४४०० mAh लिथियम बॅटरीसह येतो. जो, ५- ६ तासांचा प्लेबॅक देतो. या स्पीकरचा आउटपुट ४० W आहे आणि कनेक्टिव्हिटीसाठी यामध्ये ब्लूटूथ देण्यात आला आहे. पोर्ट्रोनिक्स डॅश ३ आकर्षक रंगांमध्ये ब्लॅक, ग्रे आणि ब्लू मध्ये ७,४९९ किमतीत उपलब्ध असून १२ महिन्यांच्या वॉरंटीसह देखील येते. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3178leD