Full Width(True/False)

Realme GT Neo2 लवकरच येणार भारतात, टिझरमधून माहिती समोर, स्मार्टफोनमध्ये 'हे' भन्नाट फीचर्स

नवी दिल्ली: Realme ने आपल्या नवीन स्मार्टफोन चा टीझर रिलीज केला असून यावरून Realme GT Neo2 लवकरच भारतीय बाजारात लाँच करण्यात येईल हे कन्फर्म झाले आहे. युजर्सना या स्मार्टफोनमध्ये AMOLED स्क्रीन, स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर आणि१२ GB रॅम मिळेल. याशिवाय ६५ W अल्ट्रा फास्ट फ्लॅश चार्ज सपोर्ट बॅटरी आणि लेटेस्ट अँड्रॉइड ११ ऑपरेटिंग सिस्टमलाही स्मार्टफोनमध्ये सपोर्ट आहे. Realme GT Neo2 स्मार्टफोन प्रथम चीनमध्ये लाँच करण्यात आला. वाचा: Realme GT Neo 2 स्मार्टफोनचा टीझर कंपनीच्या अधिकृत वेबसाइटवर सक्रिय आहे. यावरून माहिती मिळाली आहे की हे उपकरण लवकरच भारतीय बाजारात एन्ट्री करेल. मात्र, या टीझरमधून फोनच्या लाँचची तारीख जाहीर करण्यात आलेली नाही. Realme GT Neo2 ची अपेक्षित किंमत : Realme GT Neo2 च्या ८GB RAM + १२८ GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,४९९ चीनी युआन (सुमारे २८,५०० रुपये), ८GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,६९९ चीनी युआन (सुमारे ३०,८०० रुपये) आणि १२GB RAM + २५६GB स्टोरेज व्हेरिएंटची किंमत २,९९९ चीनी युआन ( सुमारे ३४,२०० रुपये) आहे. असा अंदाज लावला जात आहे की, भारतीय बाजारात या डिव्हाइसची सुरुवातीची किंमत २५,००० ते ३०,००० रुपयांच्या असू शकते. मात्र Realme GT Neo 2 च्या किंमतीबाबत कंपनीने अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. Realme GT Neo2 ची वैशिष्ट्ये: Realme GT Neo 2 स्मार्टफोन ६.६२ इंच फुल HD+ E4 AMOLED डिस्प्लेसह येईल. याचे रिझोल्यूशन २४०० × १०८० पिक्सेल आहे आणि ते HDR10+ला सपोर्ट करते. यामध्ये कॉर्निंग गोरिल्ला ग्लास ५ ग्लास वापरण्यात आला आहे. याशिवाय स्मार्टफोनमध्ये स्नॅपड्रॅगन ८७० चिपसेटला सपोर्ट असेल. ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप : Realme GT Neo2 मध्ये उत्कृष्ट फोटोग्राफीसाठी ट्रिपल रिअर कॅमेरा सेटअप देण्यात आला आहे. मुख्य लेन्स ६४ MP आहे. त्यात ८ MP अल्ट्रा वाइड अँगल लेन्स आणि २ MP मॅक्रो लेन्स आहेत. याशिवाय सेल्फी आणि व्हिडिओ कॉलिंगसाठी १६ एमपी कॅमेरा उपलब्ध असेल. बॅटरी आणि कनेक्टिव्हिटी : Realme GT Neo2 मध्ये ५००० mAh ची बॅटरी आहे. जी, ६५ W अल्ट्रा फ्लॅश चार्जिंगला सपोर्ट करते. कंपनीचा दावा आहे की, त्याची बॅटरी फक्त ३६ मिनिटात १०० % चार्ज होते. या व्यतिरिक्त, डिव्हाइसमध्ये वाय-फाय, ब्लूटूथ, जीपीएस, हेडफोन जॅक आणि यूएसबी टाइप-सी पोर्ट सारखी वैशिष्ट्ये देण्यात आली आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2Yh79nB