Full Width(True/False)

मस्तच! फक्त ३५ हजारात खरेदी करा १ लाख ६ हजाराचा ५५ इंचाचा स्मार्ट टीव्ही

नवी दिल्लीः अमेझॉनवर ३ ऑक्टोबर पासून ग्रेट इंडियन फेस्टिवल सेलची सुरुवात झाली आहे. या सेलमध्ये तुम्हाला प्रत्येक पद्धतीचे प्रोडक्ट्स वर कमालीचे ऑफर आणि डिस्काउंट्स मिळत आहेत. सोबत या प्रोडक्ट्सवर ई-कॉमर्स वेबसाइटने अनेक बँक ऑफर्स, पार्टनर ऑफर आणि कॅशबॅक दिले जात आहे. प्रोडक्ट्सवर सूट सोबत अमेझॉनचा हा सेल अनेक ब्रँड्सच्या प्रोडक्ट्सला लाँच करीत आहे. जाणून घ्या डिटेल्स. iFFALCON चा 4K टीव्ही iFFALCON चा ५५ इंचाचा अल्ट्रा एचडी स्मार्ट अँड्रॉयड एलईडी टीव्हीवर तुम्हाला ७० हजार ९९१ रुपयाची सूट मिळत आहे. या टीव्हीला तुम्ही १ लाख ६ हजार ९९० रुपयाच्या जागी फक्त ३५ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. जर तुम्ही जुना टीव्हीला एक्सचेंज करीत असाल तर तुम्हाला ११ हजार रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. तुम्हाला कॅशबॅक आणि बँक ऑफर मिळेल. एसेरचा ४२ इंचाच्या स्मार्ट टीव्हीवर सूट एसेरचा पी सीरीजचा फुल एचडी अँड्रॉयड स्मार्ट एलईडी टीव्ही तुम्हाला २९ हजार ९९९ रुपयाच्या जागी फक्त २४ हजार ९९९ रुपयात मिळू शकतो. या टीव्हीला तुम्ही जुन्या टीव्हीसोबत एक्सचेंज केल्यास तुम्हाला ३८६० रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. यावर तुम्हाला बँक ऑफर आणि कॅशबॅक ऑफर सुद्धा मिळू शकतो. iPhone 13 वर मिळेल ही ऑफर नुकताच लाँच करण्यात आलेल्या iPhone 13 ला तुम्ही अमेझॉनच्या या सेलमध्ये खरेदी केल्यास तुम्हाला अनेक ऑफर मिळतील. या फोनच्या किंमतीत कोणताही बदल करण्यात आला नाही. या फोनची किंमत १ लाख ९ हजार ९०० रुपये आहे. परंतु, जर तुम्ही या फोनला जुन्या फोनच्या बदल्यात खरेदी करीत असाल तर तुम्हाला १३ हजार ३५० रुपयांपर्यंत बचत करता येवू शकते. एचडीएफसी बँक मिलेनिया क्रेडिट कार्ड्सचा वापर केल्यास तुम्हाला ५ टक्के कॅशबॅक मिळतो. या फोनला ईएमआय वर खरेदी केले जावू शकते. शाओमीच्या नवीन स्मार्टफोनवर मिळेल सूट Xiaomi 11 Lite NE 5G 128GB स्टोरेज सोबत येतो. १३ ऑक्टोबर रोजी स्टॉक मध्ये येईल. या फोनला तुम्ही ३१ हजारा ९९९ रुपयाच्या जागी २६ हजार ९९९ रुपयात खरेदी करू शकता. कूपन डिस्काउंटचा वापर केल्यास तुम्हाला १५०० रुपयाची सूट मिळेल. तसेच बँक ऑफर आणि कॅशबॅक सुद्धा मिळेल. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3l94ogU