Full Width(True/False)

RTO ची फेक वेबसाइट बनवून ३३०० लोकांना 'असे' फसवले, जाणून घ्या डिटेल्स

नवी दिल्लीः देशाची राजधानी दिल्लीत नुकतेच एक प्रकरण समोर आले आहे. आरटीओची फेक वेबसाइट बनवून चोरांनी ७० लाखांची फसवणूक केली आहे. या व्यक्तीला अटक करण्यात आली आहे. या आरोपीने आरटीओची फेक वेबसाइट काढून जवळपास ३३०० लोकांना फसवले आहे. या पद्धतीचे गुन्हे देशात वाढत चालले आहे. कारण, सध्या सर्व काही ऑनलाइन सुरू आहे. त्यामुळे सायबर क्राइम गुन्ह्यात वाढ झाली आहे. परंतु, या सर्वांपासून दूर राहण्यासाठी तसेच आपली फसवणूक टाळण्यासाठी काय खबरदारी घ्यायला हवी, याविषयी सविस्तर जाणून घ्या. असा केला जातो फ्रॉड दुसऱ्या फ्रॉड प्रमाणे आरटीओच्या फ्रॉडची फिशिंग द्वारे केले जात आहे. हे फ्रॉड स्पॅम मेल द्वारे आपली खासगी माहिती चोरीला जावू शकते. ई-मेलवर तुम्हाला एक लिंक दिली जाते. ही पूर्णपणे फेक वेबसाइटवर तुम्हाला घेवून जाते. दिसायला ही एकदम अधिकृत वाटते. परंतु, ती अधिकृत नसते. यानंतर तुम्हाला क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्डची माहिती भरायला सांगून तुमचे सर्व पैसे चोरी केले जाते. च्या नावाने फेक वेबसाइट्सपासून असे दूर राहा कारण, सध्या आरटीओचे बहुंताश काम हे ऑनलाइन होत आहेत. यासंबंधीत फेक ऑनलाइन होत आहेत. नेहमी लक्षात ठेवा की, https वाल्या वेबसाइट्सवर विश्वास ठेवा. https ची वेबसाइट दुसऱ्या वेबसाइट्सच्या तुलनेत सुरक्षित असते. पेमेंट करणे किंवा पासवर्ड बदलण्याची प्रक्रिया वर SMS अलर्ट सुविधा घेतली पाहिजे. जर कोणताही पासवर्ड बदलण्याचा प्रयत्न करायचा असेल तर क्रेडिट कार्ड किंवा डेबिट कार्ड वरून पेमेंट केल्यास अलर्ट मेसेज येईल. तुमचा पासवर्ड वेळावेळी बदलत राहा. सर्वात महत्त्वाचे म्हणजे नेट बँकिंगचा पासवर्ड, क्रेडिट कार्ड डिटेल्स आणि यूपीआय पिन कोणासोबतही शेयर करू नका. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uQRdnW