Full Width(True/False)

लवकरच येतोय Samsung Galaxy A०३, मिळेल ५०००mAh बॅटरी; किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी

नवी दिल्ली : आपला बजेट Samsung Galaxy A03 ला लाँच करण्याच्या तयारीत आहे. डिव्हाइसला वाय-फाय एलायन्सकडून वाय-फाय सर्टिफिकेशन मिळाले आहे. याचा थोडक्यात अर्थ होतो की डिव्हाइस लाँचसाठी तयार आहे. सॅमसंग पुढील काही आठवड्यात या डिव्हाइसला लाँच करण्याची शक्यता आहे. Galaxy A03 फोन चे एक ट्रिम-डाउन व्हर्जन आहे. या फोनला गेल्या महिन्यात भारतात लाँच केले होते. या बजेट व्हर्जनमध्ये यूनिसोक चिपसेट आणि अँड्राइड ११ मिळण्याची शक्यता आहे. वाचा: Samsung Galaxy A03 चे संभाव्य स्पेसिफिकेशन सॅमसंग गॅलेक्सी ए०३ ला वाय-फाय एलायन्स सर्टिफिकेशन मिळाले आहे. परंतु, लिस्टिंगमधून कोणतेही हार्डवेअर डिटेल्स मिळाले नाही. फोनचा मॉडेल नंबर SM-A०३२F आहे व हा वाय-फाय, ब्लूटूथ आणि ४जी LTE कनेक्टिव्हिटीसह येईल. काही दिवसांपूर्वी स्मार्टफोनला गीकबेंच आणि एफसीसीवर पाहण्यात आले आहे. FCC लिस्टिंगमधून मिळाल्या माहितीनुसार, फोनमध्ये ५,००० एमएएचची बॅटरी मिळेल. हीच बॅटरी गॅलेक्सी ए०३एस मध्ये देखील मिळते. मात्र, मीडियाटेक चिपसेटऐवजी फोनमध्ये Unisoc SC९६८३A प्रोसेसर दिला जाईल. गीकबेंच लिस्टिंगद्वारे ही माहिती समोर आली आहे. चिपसेटसह २ जीबी रॅम दिली जाईल. गॅलेक्सी ए०३ मध्ये ए०३एस प्रमाणेच समान हार्डवेअर मिळण्याची शक्यता आहे. यात ६.५ इंच एचडी+ डिस्प्ले आणि १३ मेगापिक्सल प्रायमरी सेंसरसह ट्रिपल रियर कॅमेरा सेटअप दिला जाईल. A03s आणि A03 मधील मुख्य अंतर केवळ प्रोसेसरचे असण्याची शक्यता आहे. हा फोन अँड्राइड ११ वरच काम करेल व यात साइड माउंटेड फिंगरप्रिंट सेसंर दिला जाईल. गॅलेक्सी ए०३एस फोनची सुरुवाती किंमत ११,४९९ रुपये आहे. त्यामुळे गॅलेक्सी ए०३ ची किंमत १० हजार रुपयांपेक्षा कमी असण्याची शक्यता आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3b3k5jL