नवी दिल्ली : India ने ई-कॉमर्स वेबसाइट्सच्या अपकमिंग फेस्टिव्ह सीझन दरम्यान काही ठराविक Bravia आणि ऑडिओ प्रोडक्ट्सवर स्पेशल प्राइस ऑफर्सची घोषणा केली आहे. यात Sony Tv, Sony Headphones, वायरलेस सीरिज, पोर्टेबल ब्लूटूथ स्पीकर आणि साउंड बारचा समावेश आहे. ३ ऑक्टोबरपासून सुरू होणाऱ्या Great Indian Festival आणि Big Billion Days Sale मध्या या प्रोडक्ट्सला खूपच कमी किंमतीत खरेदी करू शकता. सर्व ऑफर्स रिटेल स्टोर्स आणि Sony Exclusive, www.ShopatSC.com वर देखील लागू असतील. वाचाः या फेस्टिव्ह सीझन सेलमध्ये ठराविक Bravia टीव्हीवर तीन वर्षांच्या वॉरंटीसह ५ टक्के कॅशबॅक मिळेल. हा कॅशबॅक ५ हजार रुपयांपर्यंत असेल. ठराविक टीव्हींवर ३० टक्के अतिरिक्त सूट देखील मिळेल. ही टीव्ही रेंज XR कॉग्निटिव प्रोसेसर, गुगल टीव्ही, डॉल्बी एटमॉस आणि ४के १२०fps सारख्या फीचर्ससह येते. यावर ईएमआय आणि फायनान्स स्कीमचा देखील लाभ मिळेल. Bravia TV कॉम्बो HT-G700 आणि HT-S700RF सह साउंडबारवर ३ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. तसेच, HT-S500RF आणि HT-S40R वर २ हजार रुपयांपर्यंत कॅशबॅक मिळेल. ४७,९९० रुपये किंमत असेलल्या साउंडबार HT-G700 ला ३९,९९० रुपयात खरेदी करू शकता. ९७,९८० रुपये किंमतीच्या साउंडबार HT-Z९F ला ७९,९९० रुपयात खरेदी करू शकता. वायरलेस हेडफोन WH-1000XM3 वर १२ हजार रुपये सूट मिळत आहे. हेडफोनला २९,९९० रुपयांऐवजी १७,९९० रुपयात खरेदी करता येईल. हेडफोन WH-H910N ची किंमत २४,९९० रुपये आहे व डिव्हाइसला १२,९९० रुपयात खरेदी करू शकता. WH-XB900N हेडफोनवर १० हजार रुपये सूट मिळत आहे. प्रोडक्ट्सला १९,९९० रुपयांऐवजी फक्त ९,९९० रुपयात खरेदी करू शकता. Sony ने वेगवेगळ्या प्रकारच्या इयरफोन, ब्लूटूथ स्पीकर आणि पार्टी स्पीकरवर स्पेशल ऑफर दिली आहे. WI-XB400 हेडफोनला ४,९९० रुपयांऐवजी २,७९० रुपयात खरेदी करू शकता. WI-C310 हेडफोनची किंमत ३,२९० रुपये असून, तुम्ही १,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तर WI-C200 हेडफोन २,९९० रुपयांऐवजी १,४९९ रुपयात उपलब्ध आहे. वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3inJ3ic