Full Width(True/False)

Vi चा २ महिने चालणारा रिचार्ज प्लान लय भारी, Jio आणि Airtel पेक्षा देतो दुप्पट डेटा

नवी दिल्लीः Vodafone Idea (Vi) भारतातील तिसरे सर्वात मोठे टेलिकॉम ऑपरेटर आहे. हे सर्वात जास्त प्रीपेड प्लान ऑफर करते. आज आम्ही तुम्हाला या ठिकाणी वोडाफोन आयडियाचे दोन महिने चालणाऱ्या प्रीपेड प्लान संबंधी माहिती देत आहोत. रिलायन्स जिओ आणि भारती एअरटेलच्या प्लानला या प्लानने मागे टाकले आहे. Vi च्या ५६ दिवसाच्या प्लानसंबंधी माहिती देत आहोत. यात डबल डेटा ऑफर केला जातो. तसेच कंपनी युजर्संना विकेंड डेटा रोलओव्हर ऑफर आणि बिंज ऑल नाइट ऑफर देते. जाणून या प्लानसंबंधी सर्वकाही. वोडाफोन आयडिया ४४९ रुपयाचा प्रीपेड प्लान वोडाफोन आयडियाचा ४४९ रुपयाचा प्लान ४ जीबी डेली डेटा सोबत येतो. काही सर्कलमध्ये हा प्लान डबल डेटा ऑफर सोबत येतो. युजर्संना २ जीबी डेली डेटा मिळतो. याची वैधता ५६ दिवसाची आहे. या प्लानमध्ये युजर्संना अनलिमिटेड व्हाइस कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळते. यासोबतच या प्लानमध्ये व्ही मूव्ही आणि टीव्हीचे अतिरिक्त लाभ मिळते. या सोबतच या प्लानमध्ये बिंज ऑल नाइट (Binge all-night) आणि विकेंड डेटा रोलओवर (Weekend data rollover) सुविधा सोबत येते. बिंज ऑल नाइट सुविधा अंतर्गत रात्री १२ पासून सकाळी ६ वाजेपर्यंत अनलिमिटेड डेटाचा वापर करू शकता. हे डेटा पॅक पेक्षा वेगळे आहे. विकेंड डेटा रोलओवर अंतर्गत सोमवार ते शुक्रवार पर्यंत तुमचा जो डेटा वाचला तो विकेंडला युज करू शकता. Vi vs जिओ ५६ दिवसाचा प्लान रिलायन्स जिओचा ५६ दिवसाची वैधतेच्या प्लानची किंमत ४४४ रुपये आहे. या रिचार्ज प्लान मध्ये कोणत्याही नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस रोज मिळते. या प्लानमध्ये रोज २ जीबी डेटा मिळतो. याचाच अर्थ एकूण ११२ जीबी डेटा मिळतो. तसेच या प्लानमध्ये जिओ अॅप्सचे सब्सक्रिप्शन मिळते. Vi vs एअरटेल प्लान एअरटेलचा ५६ दिवसाच्या प्लानची किंमत ४४९ रुपये आहे. जिओसारखे बेनिफिट्स देते. यात रोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग, १०० एसएमएस रोज मिळते. यासोबतच अमेझॉन प्राइम व्हिडिओ मोबाइल एडिशन, Airtel XStream आणि Wynk Music चे फ्री अॅक्सेस मिळते. या प्लानची वैधता ५६ दिवसाची आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3uTSElH