नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी कडे आपल्या यूजर्ससाठी अनेक प्रीपेड आणि पोस्टपेड प्लान्स आहेत. कमी किंमतीत येणाऱ्या या प्लान्समध्ये जास्त फायदे मिळतात. या प्लान्सची किंमत ५०१ रुपयांपासून ते २,५९५ रुपयांपर्यंत आहे. या प्लान्समध्ये मिळणाऱ्या फायद्यांविषयी जाणून घेऊया. वाचा: वोडाफोन आयडियाचा ५०१ रुपयांचा प्लान २८ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. याशिवाय बिंज ऑल नाइट व विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा मिळेल. बिंज ऑल नाइट अंतर्गत रात्री १२ ते सकाळी ६ पर्यंत अनलिमिटेड डेटा वापरू शकता. तर विकेंड डेटा रोलओव्हर अंतर्गत तुम्ही वाचलेला डेटा आठवड्याच्या शेवटी वापरू शकता. तसेच डिज्नी+ हॉटस्टार आणि मूव्हीज अँड टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वोडाफोन आयडियाचा ६०१ रुपयांचा प्लान ६०१ रुपयांच्या प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात एकूण ७५ जीबी डेटा मिळतो. हे एक ४जी डेटा वाउचर आहे, त्यामुळे अन्य बेनिफिट्स मिळणार नाहीत. यात डिज्नी+ हॉटस्टार आणि वीआय मूव्हीज अँड टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. वोडाफोन आयडियाचा ७०१ रुपयांचा प्लान ५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या या प्लानमध्ये दररोज ३ जीबी डेटाची सुविधा मिळते. यात अनलिमिटेड वॉइस कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा दिली जात आहे. प्लानमध्ये बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा देखील मिळेल. तसेच डिज्नी+ हॉटस्टार आणि वीआय मूव्हीज अँड टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वोडाफोन आयडियाचा ९०१ रुपयांचा प्लान या प्लानची वैधता ८४ दिवस असून यात दररोज ३ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस, बिंज ऑल नाइट, विकेंड डेटा रोलओव्हरसह डिज्नी+ हॉटस्टार आणि वीआय मूव्हीज अँड टीव्हीचा मोफत अॅक्सेस मिळतो. वोडाफोन आयडियाचा २,५९५ रुपयांचा प्लान २,५९५ रुपयांच्या प्लानची वैधता ३६५ दिवस असून, यात यूजर्सला दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड वॉइस कॉलिंग, दररोज १०० एसएमएस मिळतात. तसेच, बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हरची देखील सुविधा मिळेल. यात देखील डिज्नी+ हॉटस्टार आणि वीआय मूव्हीज अँड टीव्हीचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. वीआयच्या या प्लान्समध्ये डेटा, कॉलिंग, एसएमएससह ओटीटी बेनिफिट्स देखील मिळत आहेत. याशिवाय, बिंज ऑल नाइट आणि विकेंड डेटा रोलओव्हरची सुविधा इतर कोणतीच टेलिकॉम कंपनी देत नाही. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3m3R1PN