नवी दिल्ली : गेल्या अनेक दिवसांपासून सीरिज चर्चेत आहे. आता पुन्हा एकदा या सीरिजचे मुख्य फीचर्स लीक झाले आहे. या सीरिजमध्ये १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळू शकतो. या सीरिजमध्ये सर्वात प्रीमियम स्मार्टफोन Note 11 Pro अथवा असेल. हे फोन्स फास्ट चार्जिंग फीचरसह येतील. याशिवाय कंपनी आणखी काही स्मार्टफोन्सवर काम करत आहे. Redmi K50 Pro+ चे फीचर्स देखील ऑनलाइन पाहण्यात आले आहे. वाचा: टिप्स्टरनुसार, Redmi Note 11 सीरिजच्या टॉप मॉडेलमध्ये १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट मिळेल. याचे टॉप मॉडेल Redmi Note 11 Pro किंवा Redmi Note 11 Pro Max नावाने येऊ शकता. मात्र, शाओमीने याबाबत अद्याप कोणतीही माहिती दिलेली नाही. Redmi Note 10 Pro आणि Redmi Note 10 Pro Max शी तुलना केल्यास हे फोन ३३ वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टसह येतात. १२० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्टबद्दल सांगायचे तर हे केवळ Xiaomi Mix 4 आणि Xiaomi 11T Pro मध्ये मिळते. या दोन्ही फोन्सला ऑगस्ट आणि सप्टेंबरमध्ये सादर केले आहे. लवकरच हे दोन्ही फोन्स भारतीय बाजारात देखील लाँच होण्याची शक्यता आहे. दरम्यान, Redmi K50 Pro+ चे काही डिटेल्स समोर आली आहेत. लीक्सनुसार, फोनमध्ये ५००० एमएएचची बॅटरी दिली जाईल. फोनला क्वालकॉम स्नॅपड्रॅगन ८९८ चिपसेट, १०८ मेगापिक्सल कॅमेरा, पेरिस्कोप अथवा टेलिस्कोपिक लेंस, एक फ्लेक्सिबल स्क्रीन आणि एक इन-डिस्प्ले फिंगरप्रिंट स्कॅनरसह सादर केले जाईल. Redmi च्या अपकमिंग फोनबाबत गेल्या महिन्यात एका टिप्स्टरने माहिती शेअर केली होती. या फोनमध्ये ६.७ इंच फुल एचडी प्लस ओएलईडी डिस्प्ले दिला जाईल. याचे पिक्सल रिझॉल्यूशन १०८०x२४०० आहे. रिफ्रेश रेट १२० हर्ट्ज असेल. फोन स्नॅपड्रॅगन ८७० प्रोसेसर, ५० मेगापिक्सल सेंसर आणि १०० वॉट फास्ट चार्जिंग सपोर्ट आणि आयपी६८ रेटिंगसह येईल. हा फोन Redmi K50 लाइनअपचा भाग असेल. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2YNW4e0