Full Width(True/False)

आता टायमर सेट केल्यानंतर गायब होणार Whatsapp मेसेज, आले दोन नवीन फीचर्स

नवी दिल्लीः ने आपल्या २ बिलियन युजर्ससाठी दोन नवीन फीचर्स जारी केले आहे. हे फीचर्स नुकतेच आलेल्या डिसअपीयरिंग मेसेज सेटिंग (Disappearing Messages feature) ला चांगले बनवण्यासाठी आले आहे. नवीन सेटिंग्सद्वारे आता युजर्सं व्हाट्सअॅप मेसेज गायब करण्यासाठी सेट करू शकता येईल. सोबत नवीन चॅटसाठी डिफॉल्ट रूपाने काय सेटिंग करता येईल. कोणते आहेत दोन नवीन फीचर्स रिपोर्टच्या माहितीनुसार, व्हाट्सअॅपचे डिसअपीयरिंग मेसेज फीचर मध्ये पहिला बदल टायमर ऑप्शनच्या रूपाने झाला आहे. आधी युजर्स Disappearing Messages फीचरला फक्त इनेबल किंवा डिसेबल करू शकत होता. याचा अर्थ इनेबल केल्यानंतर तुम्ही मेसेज ७ दिवसानंतर आपोआप गायब होतील. WABetaInfo च्या माहितीनुसार, व्हाट्सअॅप आता या टायमर फीचरद्वारे तुम्हाला एक ड्युरेशन सेट करण्याची सुविधा देत आहे. युजर्सला आता २४ तास, ७ दिवस आणि ९० दिवसासाठी कोणतीही एक वेळ निवडण्याची सुविधा आहे. व्हाट्सअॅप बीटा मध्ये येणारा दुसरा बदल डिफॉल्ट टायमर सेटिंगचा आहे. ही सेटिंग तुम्हाला व्हाट्सअॅप प्रायव्हसी सेटिंग्स मध्ये मिळणार आहे. जी सर्व नवीन चॅट्ससाठी डिसअपीयरिंग मेसेज सेटिंग्सला डिफॉल्ट रूपाने ऑन करता येईल. याचाच अर्थ युजर्सला चॅटची सेटिंग मध्ये जावून मॅन्यूअल रूपाने याला ऑन करता येणार नाही. जर तुम्ही ९० दिवसांचा टायमर सेट केला तर प्रत्येक नवीन चॅटसाठी सेटिंग ऑटोमॅटिकली इनेबल होईल. WABetaInfo च्या माहितीनुसार, मेसेजिंग सर्विस सध्या आयओएससाठी व्हाट्सअॅपच्या लेटेस्ट बीटा व्हर्जन आणि बिझनेससाठी व्हाट्सअॅपवर या फीचरची टेस्टिंग करीत आहे. Android यूजर्स जी Android बीटाच्या लेटेस्ट व्हर्जनचा वापर करीत आहे. सध्या कोणतेही नवीन अपडेट मिळणार नाही. रिपोर्टमध्ये हे म्हटले की, या डिव्हाइससाठी सपोर्ट लवकरच येणार आहे. वाचाः वाचाः वाचाः वाचाः


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ivUjc7