नवी दिल्लीः दिग्गज टेलीकॉम कंपनी वोडाफोन-आयडिया () ने आपल्या ग्राहकांना एक जबरदस्त भेट दिली आहे. कंपनीने युजर्संना २ जीबी डेटा फ्री देण्याचा निर्णय घेतला आहे. या प्रीपेड प्लान सोबत हा डेटा ऑफर केला जात आहे. हा एक स्वस्त प्लान आहे. या प्लानमध्ये तुम्हाला डेटा आणि कॉलिंग सोबत OTT सब्सक्रिप्शन सुद्धा दिले जाते. या प्लानमध्ये मिळतोय २ जीबी पर्यंत डेटा फ्री वोडाफोन आयडियाच्या या प्लान सोबत २ जीबी डेटा फ्री दिला जातो. याची किंमत २१९ रुपये आहे. या प्लानचे खास वैशिष्ट्ये म्हणजे बोनस डेटा युजर्संना त्याचवेळी मिळेल ज्यावेळी ते थेट वेबसाइट किंवा कंपनीच्या मोबाइल अॅप्लिकेशनवरून रिचार्ज करतील. जर युजर २१९ रुपयाचा रिचार्ज पेटीएम किंवा गुगल पे सारखी अन्य थर्ड पार्टी अॅप द्वारे करतील तर त्यांना २ जीबी डेटा चा लाभ मिळणार नाही. कंपनीने आपल्या वेबसाइटवर फ्री डेटाला अॅप किंवा वेब एक्सक्लुसिव्ह (app/web exclusive) असल्याचे सांगितले आहे. प्लानमध्ये मिळणारे बेनिफिट कोणते वोडाफोन आयडियाचा २१९ रुपयाचा जवळपास महिनाभर चालणारा प्लान आहे. यात तुम्हाला २८ दिवसाची वैधता दिली जाते. यात ग्राहकांना रोज १ जीबी डेटा आणि २ जीबी अतिरिक्त डेटा दिला जातो. याप्रमाणे एकूण ३० जीबी डेटा मिळतो. प्लानमध्ये सर्व नेटवर्कवर अनलिमिटेड कॉलिंग आणि रोज १०० SMS दिले जातात. याशिवाय, ग्राहकांना Vi Movies & TV Basic चे अॅक्सेस मिळतात. जिओच्या या किंमतीत काय आहे ऑफर जिओकडे २१९ रुपयाचा प्लान तर नाही. परंतु, कंपनी १९९ रुपयाचा प्लान ऑफर करते. या प्लानमध्ये युजर्संना २८ दिवसाची वैधता मिळते. प्लानमध्ये रोज १.५ जीबी डेटा मिळतो. याप्रमाणे प्लानमध्ये एकूण डेटा ४२ जीबी डेटा ऑफर केला जातो. प्लानमध्ये कोणत्याही नंबरवर फ्री कॉलिंगचा फायदा मिळतो तसेच रोज १०० एसएमएस सोबत जिओ अॅप्सचे फ्री सब्सक्रिप्शन दिले जाते. वाचाः वाचाः वाचाः वाचाः
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2WBaVHK