Full Width(True/False)

विना इंटरनेट पाहू शकता Youtube व्हिडिओ, एक सेकंदही पडणार नाही बंद; पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : गेल्या काही वर्षात युट्यूबची लोकप्रियता प्रचंड वाढली आहे. मोफत प्लॅटफॉर्म असल्याने दररोज लाखो लोक यावर व्हिडिओ पाहत असतात. मात्र, अनेकदा तुम्ही युट्यूबवर तुमच्या आवडीचे व्हिडिओ पाहत असताना काम करत नसल्यास समस्या निर्माण होते. प्रवास करताना ही समस्या अनेकदा जाणवते. मात्र, तुम्ही विना इंटरनेट देखील पाहू शकता. यासाठी तुम्ही एका सोप्या टिप्सचा वापर करू शकता. वाचा: विना इंटरनेट पाहता येईल व्हिडिओ युट्यूबवर एक ऑफलाइन मोड नावाचे फीचर आहे. याद्वारे यूजर्स आपल्या आवडीचे व्हिडिओ, गाणी, सीरिजला डाउनलोड करू शकतात व या व्हिडिओंना कधीही विना इंटरनेटचे पाहू शकता. मात्र, ऑफलाइन मोडमध्ये व्हिडिओ डाउनलोड करण्यासाठी तुम्हाला इंटरनेटची गरज भासेल. त्यामुळे इंटरनेट असताना तुम्ही हे व्हिडिओ डाउनलोड करून ठेवू शकता व नंतर कधीही इंटरनेट नसतानाही पाहता येतील. युट्यूब व्हिडिओ डाउनलोड कसे कराल?
  • यासाठी सर्वात प्रथम युट्यूब ओपन करावे लागेल.
  • त्यानंतर तुम्हाला जो व्हिडिओ डाउनलोड करायचा आहे, तो प्ले करा.
  • आता तुम्हाला व्हिडिओच्या खाली डाउनलोडचा पर्याय दिसेल, त्यावर क्लिक करा.
  • आता तुम्हाला १४४, ३६०, ७२० पिक्सल व्हिडिओ क्वालिटीचा पर्याय निवडावा लागेल.
  • तुम्ही तुमच्या सोयीनुसार यातील पर्याय निवडू शकता.
  • ही प्रक्रिया पूर्ण झाल्यानंतर युट्यूब व्हिडिओ डाउनलोड होईल.
  • या डाउनलोड केलेल्या व्हिडिओंना तुम्ही इंटरनेशिवाय कोठेही पाहू शकता.
डाउनलोड केलेल्या व्हिडिओ या ठिकाणी होतील सेव्ह तुम्ही ऑफलाइन मोडसाठी व्हिडिओ डाउनलोड करू शकता. या व्हिडिओंना तुम्ही इंटरनेट काम करत नसतानाही पाहू शकता. हे व्हिडिओ अकाउंटच्या लायब्ररीमध्ये सेव्ह होतात. युट्यूब अकाउंच्या लायब्ररीमध्ये तुम्हाला डाउनलोड केलेले व्हिडिओ पाहता येतील. ही गोष्ट ठेवा लक्षात जर तुम्ही ऑफलाइन मोडमध्ये व्हिडिओ पाहत असाल तर ३० दिवसात एकदा तरी मोबाइलला इंटरनेटशी कनेक्ट करा. असे न केल्यास नंतर तुम्हाला ऑफलाइन मोडमधील व्हिडिओ पाहता येणार नाहीत. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3vQDttT