Full Width(True/False)

aadhar card update: घरी बसून आधार कार्ड मध्ये अपडेट करा नवा मोबाइल नंबर, अवघ्या २ मिनिटात होईल काम पूर्ण

नवी दिल्लीः आधार कार्ड मध्ये तुम्हाला जर तुमचा नवीन मोबाइल नंबर अपडेट करायचा असेल तर तुमच्यासाठी एक सोपी ट्रिक आहे. आपल्या आधार कार्ड मध्ये तुम्ही तुमचे नाव, जन्म दिवस, आधार नंबर, फोटो आणि बायोमॅट्रिक सारखी सविस्तर माहिती अपडेट करता येवू शकते. भारतात सध्या आधार कार्डला अनेक ठिकाणी वापरता येवू शकते. आधार कार्ड मध्ये काही चुकीचे झाले असेल तर तुम्ही आधार मध्ये देण्यात आलेला मोबाइल नंबर बदलता येवू शकतो. एकदम सोपी ट्रिक्स वापरून याला अपडेट करता येते. आता घरी बसून आधार कार्ड मध्ये मोबाइल नंबर अपडेट करू शकता. म्हणजेच यूआयडीएआय, आधार कार्ड धारकांना आपला फोन नंबर अपडेट करण्याची परवानगी देते. आधार कार्डमध्ये तुमचे नाव आणि जन्म तारीख सारखी पर्सनल डिटेल्स अपडेट करण्यासाठी तुमचा मोबाइल नंबर आधार आयडी सोबत रजिस्टर्ड असायला हवा. तरच अपडेट प्रक्रिये दरम्यान त्या नंबरवर ओटीपी (वन टाइम पासवर्ड) येईल. त्यामुळे आधी खात्री करून घ्या की, तुमचा रजिस्टर्ड नंबर अॅक्टिव असायला हवा. तसेच तो तुमच्याकडे असायला हवा. स्टेप १ - आपल्या आधार कार्डवर आपला फोन नंबर अपडेट करण्यासाठी सर्वात आधी यूआडीएआय वेब पोर्टल Ask.uidai.gov.in जा. स्टेप २ - तो फोन नंबर जोडा ज्याला तुम्हाला अपडेट करायचे आहे. स्टेप ३ - तुम्हाला देण्यात आलेल्या बॉक्स मध्ये सुरक्षासाठी देण्यात आलेला एक कॅप्चा टाइप करावा लागणार आहे. स्टेप ४ - तुम्हाला ओटीपी पाठवा या ऑप्शन वर क्लिक करा. तुमच्या फोन नंबर वर पाठवण्यात आलेल्या ओटीपीला त्या ठिकाणी टाका. स्टेप ५ - आता सबमिट ओटीपी अँड प्रोसीड ऑप्शनवर क्लिक करा. स्टेप ६ - पुन्हा एकदा ड्रॉपडाउन मेन्यू पाहू शकता. जो ऑनलाइन आधार सर्विसेस नोट करतो. स्टेप ७ - लिस्टमध्ये नाव, पत्ता, लिंग, ईमेल आयडी, मोबाइल नंबर तसेच बरेच काही अन्य ऑप्शन दिसतात. स्टेप ८ - आधार मध्ये फोन नंबर अपडेट करण्यासाठी मोबाइल नंबर निवडा. स्टेप ९ - सर्व आवश्यक डिटेल्स भरा. स्टेप १० - तुम्ही काय अपडेट करीत आहेत ते तुम्ही निवडू शकता. स्टेप ११ - एक नवीन पेज दिसेल. तुम्हाला एक कॅप्चा टाकावा लागेल. स्टेप १२ - मोबाइल नंबर वर एक ओटीपी पाठवला जाईल. ओटीपीला व्हेरिफाय करा. तसेच सेव्ह अँड प्रोसीड ऑप्शन वर क्लिक करा. वाचा: वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HEUPj6