हिवाळा सुरू झाला की भारतातील अनेक भागांमध्ये प्रदूषणाची समस्या वाढू लागते. दिल्ली-एनसीआरसह भारतातील अनेक शहरांमधील वायू प्रदूषण वाढले आहे. उत्तर भारतात तर वायू प्रदूषणाची गंभीर समस्या निर्माण झाली आहे. वाहनांमधून निघणार धूर, फॅक्ट्री, तसेच, शेतकऱ्यांनी जाळलेली पिकांची खूंट ही प्रदूषणासाठी कारणीभूत आहे. या प्रदूषणामुळे श्वसनांसंबधी अनेक गंभीर आजार होण्याची शक्यता आहे. अशा आजारांपासून स्वतःचा व कुटुंबाचा बचाव करण्यासाठी तुम्ही एअर प्यूरिफायर खरेदी करू शकतात. बाजारात वेगवेगळ्या प्राइस रेंजमध्ये येणारे अनेक चांगले एअर प्यूरिफायर उपलब्ध आहेत. मात्र, एअर प्यूरिफायर खरेदी करण्याआधी काही गोष्टी लक्षात घेणे गरजेचे आहे, अन्यथा तुमचे नुकसान होऊ शकते. एअर प्यूरिफायर खरेदी करताना आपण प्रामुख्याने किंमत पाहत असतो, मात्र यासोबतच फिल्टर, इंडिकेटर, CDR, फिल्टर रिप्लेसमेंट अशा अनेक गोष्टी पाहायला हव्यात.

फिल्टर
कोणत्याही एअर प्यूरिफायरचा सर्वात महत्त्वाचा पार्ट हा फिल्टर असतो. चांगल्या एअर प्यूरिफायरमध्ये HEPA, EPA सारखे फिल्टर असणे गरजेचे आहे. फिल्टर हे एअर प्यूरिफायरमधील सुरक्षेसाठीची एक महत्त्वाची गोष्ट आहे, जी PM २.५ आणि PM १० सारख्या घटकांना फिल्टर करण्याचे काम करते. प्रदूषित हवेत असे लहान कण असतात, जे हवेतून श्वास घेताना तुमच्या फुफ्फुसात शिरकाव करू शकतात. यामुळे गंभीर आजार होण्याची शक्यता असते.
इंडिकेटर
नेहमी लाइड बेस्ड इंडिकेटर्ससह येणारे एअर प्यूरिफायर खरेदी करणे गरजेचे आहे, हे तुमच्या हवेच्या क्वालिटीबाबत अलर्ट करते. जेणेकरून, तुम्हाला घराच्या बाहेर पडताना हवेच्या क्वालिटीची माहिती मिळेल व त्यानुसार नियोजन करू शकता. प्यूरिफायरमध्ये कलर आधारित इंडिकेटर्स मिळतात. रेड इंडिकेटरचा अर्थ होतो हवेची क्वालिटी खूपच खराब आहे. सोबतच, डिस्प्लेसह येणारा एअर प्यूरिफायर खरेदी करावा. जेणेकरून, तुम्हाला हवेची क्वालिटी व इतर गोष्टींची रियल टाइम माहिती मिळते.
रूमनुसार खरेदी करा एअर प्यूरिफायर
एअर प्यूरिफायरला नेहमी रुमच्या आकारानुसार खरेदी करावे. बाजारात वेगवेगळ्या आकारात येणारे एअर प्यूरिफायर उपलब्ध आहेत. त्यामुळे खरेदी करताना नेहमी तुमच्या रुमच्या आकारानुसार खरेदी करावा. मोठा एअर प्यूरिफायर खरेदी केल्यास समस्या निर्माण होऊ शकते.
CDR
CDR म्हणजे क्लिन एअर डिलिव्हरी रेट. एअर प्यूरिफायर खरेदी करताना लक्ष द्यायला हवे की तुमचा प्यूरिफायर किती शुद्ध हवा किती वेगाने पंप करत आहे. बहुतांश कंपन्या सीडीआरला एअर प्यूरिफायच्या मॉडेलवर नमूद करते. त्यामुळे खरेदी करताना हा घटक नक्की पाहावा.
फिल्टर रिप्लेसमेंट
वॅक्यूम क्लिनर आणि वॉटर प्यूरिफायरप्रमाणे एअर प्यूरिफायरच्या फ्लिटरला देखील नेहमी साफ करावे. फिल्टरला वेळोवेळी बदलणे देखील गरजेचे आहे. त्यामुळे नेहमी सहज काढताना येणारे फिल्टर्स असणारेच एअर प्यूरिफायर खरेदी करावे.
वीजेचा वापर आणि आवाज
सर्वसाधारणपणे एअर प्यूरिफायरचा वापर दिवस-रात्र होतो. त्यामुळे जे एअर प्यूरिफायर कमी वीज वापरतात असेच खरेदी करावे. अन्यथा तुम्हाला अतिरिक्त वीज बिल भरावे लागेल. सोबतच, कमी आवाज खरेदी करणाऱ्या प्यूरिफायरला प्राधान्य द्यावे.
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3wK9Ef8