Full Width(True/False)

Airtel vs Jio vs Vi: ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत ५६ दिवस वैधता, पाहा कोणाचा प्लान बेस्ट?

नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी , आणि कडे ५०० रुपयांपेक्षा कमी किंमतीत येणारे अनेक शानदार प्लान्स आहे. या प्लान्समध्ये डबल डेटा आणि स्ट्रीमिंग बेनिफिट्स मिळतात. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि एसएमएसची देखील सुविधा मिळते. या तिन्ही कंपन्यांकडे ५६ दिवसांच्या वैधतेसह येणारे अनेक शानदार आहेत. या प्लान्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. वाचा: Jio च्या ४४४ रुपयांच्या प्रीपेड प्लानची वैधता ५६ दिवस असून, यात दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. सोबतच, अ‍ॅप्सचे मोफत सबस्क्रिप्शन मिळते. Airtel च्या ४४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, Prime Video Mobile Edition, Airtel XStream आणि Wynk Music चे मोफत सबस्क्रिप्शन मिळेल. Vi च्या ४४९ रुपयांच्या प्रीपेड प्लानमध्ये डबल डेटा बेनिफिट मिळतो. या प्लानमध्ये ५६ दिवसांसाठी दररोज ४ जीबी डेटा मिळतो. तसेच, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएस दिले जातात. या प्लानमध्ये बिंज ऑल – नाइट आणि विकेंड डेटा रोल ओव्हरची सुविधा दिली आहे. Airtel च्या ५६ दिवस वैधतेसह येणाऱ्या प्लानची किंमत ३९९ रुपयांपासून सुरू होते. यामध्ये दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. तसेच, कंपनीकडे ३४९ रुपये आणि ३९८ रुपयांचा प्लान देखील आहे. Vi चा २६९ रुपयांचा प्लान देखील ५६ दिवस वैधतेसह येतो. यात ६०० एसएमएस आणि अनलिमिटेड कॉलिंगची सुविधा मिळते. प्लानमध्ये एकूण ४ जीबी डेटा मिळतो. तसेच, कंपनीकडे ३९९ रुपयांचा प्लान असून, यात दररोज १.५ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3HLgvKj