नवी दिल्ली : टेलिकॉम कंपनी एअरटेलने प्रीपेड प्लान्सच्या किंमती वाढवल्या आहेत. प्लान्सवरील नवीन किंमती २६ नोव्हेंबरपासून लागू होतील. ने माहिती दिली की, टॅरिफमध्ये वाढ करत Average Revenue Per User (ARPU) वाढवण्याचा प्रयत्न आहे. लवकरच आणि देखील आपल्या प्लान्सच्या किंमतीत वाढ करू शकतात. वाचा: याआधी डिसेंबर २०१९ मध्ये रिचार्ज प्लान्सच्या किंमतीत वाढ करण्यात आली होती. नवीन किंमतीमुळे ग्राहकांना आता प्रीपेड प्लानसाठी जास्त पैसे खर्च करावे लागतील. मात्र, या नवीन किंमती लागू होण्यास अद्याप वेळ आहे. त्यामुळे आताच वर्षभराचा रिचार्ज करुन तुम्ही पैसे वाचवू शकता. जर तुम्ही १.५ जीबी अथवा २ जीबी डेटासह येणारे प्लान शोधत असाल तर एअरटेलकडे वर्षभराच्या वैधतेसह येणारे प्लान्स आहेत. या रिचार्ज प्लान्सची किंमत देखील कमी आहे. Airtel कडे वर्षभराच्या वैधतेसह येणाऱ्या प्लान्सची किंमत १,४९८ रुपये आणि २,४९८ रुपये आहे. नवीन किंमती लागू झाल्यानंतर १,४९८ रुपयांच्या प्लानसाठी १,७९९ रुपये आणि २,४९८ रुपयांच्या प्लानसाठी २,९९९ रुपये खर्च करावे लागतील. १,४९८ रुपयांच्या प्लानमध्ये एकूण २४ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि दररोज १०० एसएमएसची सुविधा मिळते. कंपनीचा २,४९८ रुपयांचा प्लान देखील वर्षभराच्या वैधतेसह येतो. या प्लानमध्ये दररोज २ जीबी डेटा, अनलिमिटेड कॉलिंग आणि १०० एसएमएस मिळतात. या प्लानमध्ये यूजर्सला Disney+ Hotstar Mobile सबस्क्रिप्शन देखील मिळते. यूजर्स किंमती वाढण्याआधीच हे रिचार्ज करुन शेकडो रुपये वाचवू शकतात. वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3kZFFv0