Full Width(True/False)

Android फोनमधील सॉफ्टवेयर Updates कडे दुर्लक्ष करत असाल तर, होऊ शकते 'हे' नुकसान

नवी दिल्ली: आजकाल स्मार्टफोन अधिक मॉडर्न होत असून हे सर्व नवीन तंत्रज्ञानामुळे शक्य झाले आहे. अनेकदा स्मार्टफोन निर्माते स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर Updates संबंधित सूचना पाठवत असतात. तुम्हाला देखील हे नोटिफिकेशन्स मिळतच असतील. आणि तुम्ही त्याकडे दुर्लक्ष देखील केले असेल. पण, तुमच्याकडून ही चूक झाली असेल, तर लगेच दुरुस्त करा. नोटिफिकेशन्स कंपन्यांकडून पाठवल्या जातात. त्यामागील प्रमुख कारण असते फोन अपडेट करणे आणि न केल्याने तुमचेच नुकसान होऊ शकते. वाचा: नवीन तंत्रज्ञान: कंपनीने सॉफ्टवेअर अपडेटमध्ये सुरक्षा आणि नवीन वैशिष्ट्ये समाविष्ट केली असतात . यासोबतच अॅपचा वापर सोपा आणि फायदेशीर करण्यात येतो. उत्तम सुरक्षा: आजच्या काळात सायबर सुरक्षा खूप महत्त्वाची झाली आहे. स्मार्टफोन आणि ईमेल आयडीचे सायबर गुन्हेगारांपासून संरक्षण करण्यासाठी कंपन्या सॉफ्टवेअर अपडेट्समध्ये सुरक्षा अपडेट्सकडे अधिक लक्ष देतात. सुरक्षा मजबूत करताना अॅपची ऑपरेटिंग सिस्टम सुधारली आहे. पूर्वीपेक्षा चांगले: अनेकदा काही अॅप्स वापरताना तुम्हाला काही त्रुटी दिसताता. अशात कंपन्या अपडेट करून या त्रुटी दूर करतात. स्पीडमध्ये वाढ : अपडेटमध्ये स्मार्टफोनचा स्पीड वाढवला जातो. जर तुम्ही अपडेट केले तर तुमच्या फोनचा आणि त्यातील अॅप्सचा वेग वाढेल. तुम्ही अॅपमध्ये असलेल्या वैशिष्ट्यांमध्ये जलद प्रवेश करू शकाल आणि स्ट्रीमिंग अधिक चांगले होते. सॉफ्टवेअर अपडेट न करण्याचे तोटे: सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट करा. आजकाल फोन सुरक्षेकडे बरेच लक्ष दिले जात आहे, कारण स्मार्टफोनमध्ये युजर्सचा महत्वाचा आणि वैयक्तिक डेटा असतो. जर तुम्ही सॉफ्टवेअर वेळेवर अपडेट केले नाही तर तुमची सुरक्षा धोक्यात येऊ शकते. स्मार्टफोनमध्ये अत्याधुनिक तंत्रज्ञान नसल्यामुळे हॅकर्स तुमचा फोन सहज हॅक करू शकतात. जगात अँड्रॉईड स्मार्टफोनचा सर्वाधिक वापर केला जातो आणि त्यामुळे येथे धोक्याची शक्यताही वाढते. त्यांच्या वापरकर्त्यांना हॅकर्सपासून वाचवण्यासाठी कंपन्या सतत सुरक्षा सुधारतात आणि त्यासाठी अपडेट्स पाठवत राहतात. आता जेव्हा जेव्हा तुम्हाला तुमच्या स्मार्टफोनमध्ये सॉफ्टवेअर अपडेट नोटिफिकेशन मिळेल, तेव्हा तुम्हाला ते लगेच अपडेट करावे लागेल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3D7MrGf