Full Width(True/False)

Apple च्या ‘या’ फीचरमुळे फेसबुक-ट्विटरला झाले १० बिलियन डॉलर्सचे नुकसान, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : च्या सिक्योरिटी फीचरमुळे , आणि ला मोठे नुकसान झाले आहे. Apple ने प्रायव्ही फीचर्समध्ये बदल केल्याने या कंपन्यांना नुकसान झाले आहे. रिपोर्टनुसार, या सोशल साइट्सला कमाईत जवळपास १० बिलियन डॉलर्सचे नुकसान झाले. अ‍ॅपलच्या अ‍ॅप ट्रॅकिंग ट्रांसपरेंसी पॉलिसीनंतर स्नॅपचॅट, , आणि युट्यूबसह इतर अ‍ॅप्सला नुकसान झाले आहे. वाचा: फेसबुकला आपल्या Reach मुळे इतरांच्या तुलनेत जास्त नुकसान सहन करावे लागले. रिपोर्टमध्ये म्हटले आहे की, स्नॅपचॅटने आपल्या उत्पन्नाच्या तुलनेत सर्वात वाईट कामगिरी केली. कारण त्यांच्या जाहिराती स्मार्टफोनशी संबंधित आहेत. अ‍ॅपलच्या अ‍ॅप ट्रॅकिंग ट्रांसपरेंसी पॉलिसीमुळे यूजर्सला कोणते अ‍ॅप त्यांच्या ऑनलाइन आणि आयफोनवरील हालचाली ट्रॅक करत आहे व जाहिरातींसाठी डेटा जमा करत आहे, हे कंट्रोल करण्याची परवानगी मिळते. IOS 14.5 च्याआधी अ‍ॅप्सद्वारे ट्रॅकिंग डिफॉल्ट चालू होती. एप्रिलपासून या नवीन पॉलिसीचा सोशल मीडिया प्लॅटफॉर्म्सवर परिणाम झाला आहे. जाहिरातीसंदर्भात डेटा गोळा करणारी कंपनी लोटेमनुसार, फेसबुक, स्नॅपचॅट, युट्यूब आणि ट्विटरचा महसूल खूपच कमी झाला आहे. सोशल मीडिया अ‍ॅप्समध्ये १२ टक्के घट झाली. रिपोर्टनुसार, सोशल मीडिया अ‍ॅप्सच्या एकूण उत्पन्नात ९.८५ बिलियन डॉलर्सची घट झाली आहे. लोटेमचे सीओओ माइक वूसली म्हणाले की, अ‍ॅप ट्रॅकिंग पॉलिसीमुळे आयफोन यूजर्सला कमी जाहिराती दिसत आहे. जाहिरातीसाठी डिव्हाइसला तयार करण्यासाठी अनेक वर्ष लागू शकता, असे एरिक सेफर्ट यांनी म्हटले आहे. याआधी फेसबुकचे सीईओ मार्क झुकरबर्ग म्हणाले होते की, या बदलांद्वारे अ‍ॅपल केवळ फेसबुकच नाही तर लाखो लहान व्यवसायांना नुकसान पोहचवत आहे. अ‍ॅपलच्या अ‍ॅप ट्रॅकिंग ट्रांसपरेंसी आणि जाहिरात बिझनेसवरील प्रभावामुळे फेसबुकला मोठा तोटा झाला आहे. ते म्हणाले की, अडचणीच्या काळात जाहिरात प्लॅटफॉर्मवर विश्वास ठेवणाऱ्या लहान व्यवसायांवर आयओएस प्रायव्हसी फीचर्सचा परिणाम होत आहे. फेसबुकचे सीएफओ डेव्हिड वेन म्हणाले की, या पॉलिसीचा सामना करणे आवाहनात्मक आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bO29KJ