Full Width(True/False)

महेश मांजरेकरांना आहे एक खंत, बोलून दाखवले दुःख

मुंबई : दिग्दर्शक आणि अभिनेता यांनी कर्करोगावर मोठ्या हिंमतीने मात केली. असे काही आपल्याबाबतीत होईल, असे त्यांच्या ध्यानीमनी देखील नव्हते. याबाबतचा अनुभव त्यांनी नुकत्याच एका मुलाखतीत दिला. याशिवाय त्यांनी एक खंतही बोलून दाखवली. या मुलाखतीमध्ये महेश यांनी सांगितले की, दीड वर्षांपूर्वीच जर कॅन्सरवर उपचार सुरू केले असते तर त्यांचे ब्लॅडर (मुत्राशय) वाचले असते. 'अंतिमः द फायनल ट्रूथ' या सिनेमाच्या चित्रीकरणावेळी महेश यांना ब्लिडिंग झाल्यामुळे त्यांना मूत्राशयाचा कॅन्सर झाल्याचे समजले होते. महेश मांजरेकर यांनी कॅन्सरचे अनुभव एका मुलाखतीमध्ये मोकळेपणाने मांडले आहेत. हे अनुभव सांगताना त्यांनी एका गोष्टीबद्दल खंत वाटत असल्याचेही सांगितले. महेश यांनी मुलाखतीमध्ये सांगितले की, 'मला मूत्राशयाचा त्रास होत असल्याने त्यावर मी औषधे घेत होतो. परंतु सिनेमाच्या चित्रीकरणावेळी मला रक्तस्त्राव होऊ लागला. त्यानंतर मी तातडीने डॉक्टरकडे गेलो आणि तपासणी केली. त्यावेळी कर्करोगाचे निदान झाले. याचाच अर्थ असा होता की मला जो त्रास होत होता तो कर्करोगाचा होता. जर मी वेळीच कॅन्सरवर उपचार सुरू केले असते तर आज माझे मूत्राशय वाचले असते.' तीन महिने सुरू होती केमोथेरेपी महेश मांजरेकर यांनी पुढे सांगितले की, 'अंतिम'च्या चित्रीकरणावेळी त्यांच्यावर तीन महिने केमोथेरेपी सुरू होती. केमो सुरू असताना ते चित्रीकरण करत होते. महेश यांनी पुढे सांगितले की, सलमानला जेव्हा या आजाराबद्दल कळले तेव्हा त्याने परदेशात जाऊन उपचार करून घेण्याचा सल्ला दिला होता. परंतु महेश यांनी जे डॉक्टर उपचार करत होतो त्यांच्यावर विश्वास असल्याचे सांगत येथेच उपचार केले. महेश यांनी पुढे सांगितले की, 'केमो सुरू असताना त्याचा फारसा त्रास मला झाला नाही. ऑपरेशन झाल्यानंतर मला बरे होण्यासाठी तीन महिने लागले.' लोकांची सहानुभूती नको होती महेश यांनी या मुलाखतीमध्ये पुढे सांगितले की, 'मी सर्वांना मला कॅन्सर झाला आहे, याची कुठेही चर्चा करू नका असे सांगितले होते. ही बातमी कुणालाही कळता कामा नये याची काळजी घेतली होती. कारण देशात अनेक लोकांना कॅन्सर होतो. मला झाला त्यात मोठी गोष्ट नाही. तसेच मला कॅन्सर झाला हे समजल्यावर लोकांच्या नजरेत सहानुभूती, दया येते ती मला नको होती.' 'अंतिम' सिनेमाचा ट्रेलर जेव्हा रिलीज झाला तेव्हा महेश मांजरेकर यांनी सांगितले की कॅन्सरच्या काळात त्यांचे ३५ किलो वजन कमी झाले होते. ने सांगितले की, महेश यांना जेव्हा कॅन्सर झाल्याचे कळले तेव्हा सिनेमाचे चित्रीकरण सुरू झाले नव्हते. परंतु त्यांनी ही गोष्ट सर्वांपासून लपवून ठेवली. 'अंतिमः द फायलन ट्रूथ' या सिनेमातून टीव्ही अभिनेत्री महिमा मकवाना बॉलिवूडमध्ये पदार्पण करत आहे. हा सिनेमा २६ नोव्हेंबर रोजी प्रदर्शित होणार आहे. या सिनेमात सलमान खान पोलिस अधिकाऱ्याची भूमिका साकारत आहे तर आयुष शर्मा खलनायकाची भूमिका साकारणार आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3EDNn5y