Full Width(True/False)

Apple: अ‍ॅपल ड्रोन आणण्याच्या तयारीत? पेटेंटमधून झाला खुलासा, पाहा डिटेल्स

नवी दिल्ली : कारची गेल्या अनेक दिवसांपासून चर्चा आहे. मात्र, कंपनीने अद्याप कार लाँच केलेली नाही. आता कंपनी ड्रोनवर काम करत असल्याचे समोर आले आहे. वाचा: रिपोर्टनुसार, अ‍ॅपलने गेल्यावर्षी मे मध्ये सिंगापूरमध्ये पेटेंट्स फाइल केले होते. कंपनीने अमेरिकेत मात्र एप्रिलमध्ये पेटेंट फाइल केले आहे. ११ नोव्हेंबरला कंपनीला याचे पेटेंट मिळाले आहे. रिपोर्टनुसार, अमेरिकन पेटेंट आणि ट्रेडमार्क ऑफिसने अ‍ॅपलच्या अनमॅन्ड एरियल व्हिकलसाठी () दोन पेटेंट अ‍ॅप्लिकेशन पब्लिश केले आहे. या अ‍ॅप्लिकेशनद्वारे अ‍ॅपलच्या ड्रोन प्रोजेक्टबाबत बरीच माहिती समोर आली आहे. अ‍ॅपलद्वारे फाइल करण्यात आलेल्या पेटेंट अ‍ॅप्लिकेशनमध्ये ड्रोनच्या बेसिक वर्किंग मेथड आणि कंट्रोलबाबतची माहिती दिली आहे. तसेच, ड्रोनला पेअर करणे व इतर सिस्टमबाबत देखील माहिती दिली आहे. दुसऱ्या पेटेंटमध्ये ड्रोनला मॉनिटर आणि कंट्रोल करण्याच्या मेथडबाबत माहिती दिली आहे. अ‍ॅपलचा हा ड्रोन प्रोजेक्ट कधीपर्यंत समोर येईल व कसा असेल, याबाबत अद्याप स्पष्ट माहिती समोर आलेली नाही. कंपनीने देखील ड्रोनबाबत अधिकृतपणे कोणतीही माहिती दिलेली नाही. जर कंपनी ड्रोनशी संबंधित पेटेंट्सवर काम करत असल्यास लवकरच यासंबंधीचे लीक समोर येऊ शकतात. अ‍ॅपल नेहमीच लाँच इव्हेंटमध्ये कॅमेऱ्यावर लक्ष केंद्रीत करते. कंपनीच्या फोनमध्ये देखील शानदार कॅमेरा मिळतो. त्यामुळे कंपनी फिल्म मेकर्स अथवा डॉक्यूमेंट्री मेकर्ससाठी खास ड्रोन लाँच करू शकते. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ozZOJc