Full Width(True/False)

बालदिन विशेष: मायरला दिलं चाहत्यानं खास गिफ्ट तर साईशा सांगतेय सेटवरची धम्माल मस्ती

पत्र आहे खास मला स्क्रिप्ट वाचता येत नाही. म्हणून दिग्दर्शक काका सबंध सीन सादर करून दाखवतात. प्रार्थना ताई, श्रेयस दादासुद्धा मला मालिकेची गोष्ट समजावून सांगतात. संकर्षण दादाकडे एका चाहत्यानं माझ्यासाठी नटराजाची मूर्ती, गुलाबाचं फूल आणि खास माझ्यासाठी लिहिलेलं पत्र पाठवलं होतं. हे मला मिळालेलं पहिलं पत्र मी जपून ठेवलं आहे. मी प्लेग्रुप आणि नर्सरीसाठी शाळेत गेले आहे. शाळेत जाऊन मित्रमैत्रिणींबरोबर एकत्र डबा खाणं मी खूप मिस करते. आम्ही सगळे फ्रेंड्स महिन्यातून एकदा कोणाच्या तरी घरी भेटतो आणि खूप खेळतो, धम्माल करतो. - (परी-माझी तुझी रेशीमगाठ) अभिनय, गायन आणि नृत्य मला खरं तर जाहिरातीत काम करायचं होतं. पण अनपेक्षितपणे दीपिकाची भूमिका मला मिळाली. आता मी आई-आजीबरोबर बागेत, हॉटेलमध्ये जाते तेव्हा माझ्याएवढी लहान मुलं जवळ येऊन 'तू दीपिका आहेस ना' असं कौतुकानं विचारतात. मला खूप गंमत वाटते. मास्क लावलेला असूनही प्रेक्षक मला बरोबर ओळखतात. सेटवर माझे सगळे हट्ट पुरवले जातात. हर्षदा ताई, आशुतोष दादा सीनच्या वेळीही खूप सांभाळून घेतात. मला गाणी गायलाही खूप आवडतं. सध्या शाळा ऑनलाइन सुरू असली तरीही प्रत्यक्ष वर्गात जाऊन धमाल करण्यासाठी मी आतुर आहे. - स्पृहा दळी (दीपिका-रंग माझा वेगळा) दंगा आणि खाऊची चंगळ आम्ही सगळे सेटवर खूप दंगा करतो. मनसोक्त पकडापकडी, लपाछपी खेळतो. वयानं मोठे असलेले कलाकार ताई-दादासुद्धा लहान होऊन आमच्याबरोबर खेळतात. कधी कधी सेटवर माझा मराठी संभाषणाचा वर्गही घेतला जातो. सेटवर खाऊची, चॉकलेट्सची चंगळ असते. 'कार्तिकी तू खूप छान काम करतेस, खूप मोठी हो!' हा प्रेक्षकांकडून मिळालेला आशीर्वाद माझ्यासाठी खूप महत्त्वाचा आहे. गेलं दीड वर्ष प्रत्यक्ष शाळेत जाण्याचा आनंद घेता येत नाहीय. मी शाळेला खूप मिस करते. लवकरात लवकर शाळेत जाऊन मित्रमैत्रिणींना आणि शिक्षकांना भेटण्याची इच्छा आहे. - साईशा भोईर (कार्तिकी-रंग माझा वेगळा) गाण्यांच्या भेंड्या आमच्या मालिकेतील प्रशस्त डायनिंग टेबल सीन संपल्यावर गाण्यांच्या भेंड्यांचा अड्डा होतो. एकमेकांना दाद देत सुरेल मैफिली रंगतात. सेटवर माझं वेळच्या वेळी खाणं-पिणं होतंय ना, याकडे सर्वच ज्येष्ठ कलाकार बारकाईनं लक्ष देतात. माझ्या आई-बाबांच्या मित्र परिवाराला माझ्या कामाचं खूप कौतुक आहे. खास व्हिडीओ कॉलवरून मला त्यांच्याकडून शाबासकी मिळते. रस्त्यावर चालत असतानाही प्रेक्षक मला ओळखतात आणि माझ्याबरोबर फोटो काढतात. एका मावशीनं त्यांच्या लाडक्या खोडकर दुमन्याला हॉटेलमध्ये दिलेली ट्रीट ही माझ्यासाठी खूप स्पेशल आठवण आहे. - अर्जुन कुमठेकर (दुमन्या-तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं) आजोबांच्या नावांच्या भूमिका सोशल मीडियावर माझं खूप कौतुक होतं. पण मला अजून खूप काम करायचं आहे आणि त्यासाठी पाय जमिनीवर राहायला हवेत म्हणून प्रत्येक प्रतिक्रिया आई-बाबा मला वाचून दाखवत नाहीत. 'जय जय स्वामी समर्थ' या मालिकेत मी कृष्णप्पा आहे. 'स्वामिनी' मालिकेत मी रामचंद्र ही भूमिका करत होतो. माझ्या आईचे बाबा आणि बाबांचे बाबा यांची खरी नावं रामचंद्र आणि कृष्णप्पा अशी आहेत. माझ्या आजोबांच्या नावांची पात्र साकारायला मिळाली याचा खूप आनंद आहे. सेटवर खूप खेळीमेळीचं वातावरण असतं. चंदा ताईबरोबर रिल्स करतानाही खूप मजा येते. कधी शूटिंगमुळे ऑनलाइन शाळेला हजेरी लावता आली नाही तर माझे मित्र मला आठवणीनं त्या दिवसाच्या नोट्स पाठवतात. - नित्या पवार (कृष्णप्पा-जय जय स्वामी समर्थ) संकलन : गौरी आंबेडकर, एसएनडीटी विद्यापीठ


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3otI0PW