नवी दिल्ली : ई-कॉमर्स साइट अॅमेझॉनच्या डेली अॅप क्विजला सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात ५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. यूजर्स अॅपच्या माध्यमातून या क्विजमध्ये भाग घेऊ शकतील. वाचा: क्विजमध्ये ५ प्रश्न विचारले जातात व बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. क्विजमध्ये जनरल नॉलेज आणि करंट अफेअर्सवर आधारित प्रश्न विचारले जातात. या क्विजला दररोज रात्री १२ वाजता सुरुवात व दुसऱ्या दिवशी मध्यरात्री १२ पर्यंत यात भाग घेता येईल. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे १. बीबीसीच्या रिपोर्टनुसार २०२० मध्ये कोणते अॅप सर्वाधिक डाउनलोड करण्यात आले? उत्तर – टीकटॉक २. एकही सेट न गमवता Emma Raducanu च्या आधी कोणत्या महिला खेळाडूने US Open चे विजेतेपद पटकावले होते? उत्तर – सेरेना विलियम्स ३. क्विन एलिजाबेथ द्वितीय यांच्या निधनानंतर ब्रिटनमध्ये जे काही घडेल त्यासाठीच्या योजनेला कोणते सांकेतिक नाव दिले आहे? उत्तर – ऑपरेशन लंडन ब्रिज ४. ग्रेट ब्रिटनचा भाग असलेल्या कोणत्या प्रदेशाचा हा ध्वज आहे? उत्तर – वेल्स ५. पूर्वेकडच्या या देशाच्या सीमेला लागून असलेला महासागर ओलांडून एकट्याने उड्डाण करणारी पहिली महिला वैमानिक कोण होती? उत्तर - Amelia Earhart वाचा: वाचा: वाचा:
from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3neYThG