Full Width(True/False)

'दोघे बाईकवरून आले आणि...' अभिनेत्रीला आला वाईट अनुभव

मुंबई- टीव्ही आणि चित्रपटांमधून प्रेक्षकांची मनं जिंकणारी अभिनेत्री तिच्यासोबत मुंबईत घडलेल्या एका घटनेमुळे खूप अस्वस्थ आहे. या घटनेचा निकिताला मोठा धक्का बसला आहे. 'कबीर सिंह' चित्रपटानंतर निकिताच्या करिअरचा ग्राफ उंचावत आहे. निकितादेखील तिचे निरनिराळे फोटो सोशल मीडियावर शेअर करत असते. मात्र नुकत्याच आलेल्या एका अनुभवाने निकिताला धक्का बसला आहे. वॉक दरम्यान दोन व्यक्ती निकिताचा फोन घेऊन पसार झाल्या. निकिताने तिचा अनुभव सोशल मीडियाद्वारे शेअर केला आहे. निकिताने इन्स्टाग्रामवर पोस्ट करत लिहिलं, 'मी तुमच्यासोबत एक गोष्ट शेअर करू इच्छिते. कालचा दिवस माझ्यासाठी खूप वाईट होता. आणि गेले २४ तास मी त्याच घटनेचा विचार करतेय. मी बांद्राच्या परिचित परिसरातून चालत होते. संध्याकाळची ७ वाजून ४५ मिनिटं झाली होती. अचानक दोन व्यक्ती माझ्या मागून बाईकवर आले आणि त्यांनी माझ्या डोक्यावर हळूच मारलं. जसं माझं लक्ष विचलित झालं तसं त्यांनी हातातून माझा फोन खेचला आणि तिथून पसार झाले. जोपर्यंत मी काही समजू शकले तोपर्यंत ते दूर निघून गेले.' पुढे निकिताने लिहिलं, 'तीन चार सेकंद मला काहीही कळालं नाही. तिथे आसपास असलेल्या लोकांनी मला बसवलं. मला पाणी विचारलं. एक व्यक्ती तर त्याच्या बाईकवरून चोरांच्या मागेही गेला मात्र ते खूप दूर गेले होते. या घटनेमुळे मला जवळपास पॅनिक अटॅक आला होता. मला खूप रडू आलं. मी बांद्रा पोलीस स्टेशनमध्ये तक्रार दाखल केली आहे. परंतु, ही पोस्ट मी तुमच्यासाठी लिहिली आहे जेणेकरून आपण कष्टाने कमावलेल्या पैशाने घेतलेलं काहीही आपली चूक नसताना आपल्याला गमवावं लागू नये.' निकिताच्या या पोस्टवर अनेकांनी तिची विचारपूस केली आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3d0xWID