Full Width(True/False)

Photos- शाल्मली खोलगडेने बॉयफ्रेंड फरहान शेखशी केलं लग्न

मुंबई- आपल्या आवाजाने संपूर्ण बॉलीवूडला वेड लावणारी लोकप्रिय गायिका नुकतीच विवाहबंधनात अडकली आहे. शाल्मलीने तिचा बॉयफ्रेण्ड सोबत लग्नगाठ बांधली आहे. २२ नोव्हेंबर रोजी राहत्या घरात छोटेखानी पद्धतीने हा सोहळा पार पडला. या सोहळ्याला शाल्मली आणि फरहान यांच्या घरातील सदस्य उपस्थित होते. शाल्मलीने तिच्या लग्नाचे फोटो चाहत्यांसोबत शेअर केले असून ते सोशल मीडियावर चांगलेच वायरल झाले आहेत. शाल्मली आणि फरहान यांना नोंदणीकृत पद्धतीने विवाह करण्याची इच्छा होती. मात्र घरच्यांच्या आग्रहाखातर शाल्मली आणि फरहान यांनी घरातच लग्नाच्या विधी पार पाडल्या. येत्या १ डिसेंबरला शाल्मली आणि फरहान यांच्या लग्नाचं रिसेप्शन ठेवण्यात आलं आहे. या समारंभाला सगळ्या नातेवाईकांना आणि मित्रपरिवाराला आमंत्रित करण्यात आलं आहे. फरहान हा साऊंड इंजिनिअर असून शाल्मली आणि फरहान गेले सहा वर्ष एकमेकांना डेट करत आहेत. लग्नाच्या दिवशीच त्यांनी साखरपुडाही केला आहे. शाल्मलीच्या लग्नाच्या फोटोंनी सोशल मीडियावर धुमाकूळ घातला आहे. त्यातही शाल्मली आणि फरहान यांच्या गळ्यातील हारांनी नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेतलं आहे. शाल्मली आणि फरहान यांच्या हारामध्ये फुलांसोबत त्यांचे फोटोही लावण्यात आले होते. हे अनोखे हार नेटकऱ्यांच्या चर्चेचा विषय बनला आहे. शाल्मलीने 'बलम पिचकारी', 'दारू देसी', 'बेशर्मी की हाईट', 'बेबी को बेस पसंद हैं', 'शनिवार राती', 'लत लग गई' यांसारख्या हिट गाण्यांना आपला आवाज दिला आहे. शिवाय तिने अनेक हिंदी आणि मराठी रिअॅलिटी शोसाठी परीक्षक म्हणूनही काम केलं आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3o5ufrs