Full Width(True/False)

'मुस्लिम झाकीर खानही आहे, त्याला का नाही कोणी बॉयकॉट करत'

मुंबई- 'कॉमेडी करायची असेल तर झाकीर खानकडून शिका, मुनव्वर फारुकीसारखी कोणत्याही धर्माची खिल्ली उडवण्याची गरज नाही.' स्टँड-अप कॉमेडीच्या वादावर ट्विटरवर अशा कमेन्ट केल्या जात आहेत. खरं तर, मुनव्वर फारुकी ने रविवारी तो कॉमेडी सोडत असल्याचे संकेत दिले. 'द्वेष जिंकला, कलाकार हरला' अशा धाटनीची पोस्ट सोशल मीडियावर शेअर करत त्याने आपल्या मनातल्या भावना व्यक्त केल्या. यानंतर अनेकांनी फारुकीच्या समर्थनार्थ पोस्ट केल्या. फारुकी मुस्लीम असल्याने त्याला लक्ष्य करण्यात येत असल्याचं मत अनेकांनी मांडलं. आता काहींनी समर्थन केलं म्हटल्यावर त्याच्याविरोधात बोलणारेही असणारच. पलटवार म्हणून अनेक युझर्सने मुस्लिम कलाकारांची नावं घेत त्यांची काही उदाहरणं दिली. या 'कलाकारां'ची कॉमेडी अशा वादात कशी अडकली नाही, असा प्रश्नही विचारण्यात आला. यासोबतच फारुकीनेही त्यांच्याकडून शिकायला हवं असा उपदेशही दिला गेला. काय म्हणाला मुनव्वर फारुकी ? सोशल मीडियावर प्रसिद्ध केलेल्या निवेदनात मुनव्वर फारुकी म्हणाला की, बंगळुरूमधील रविवारचा कार्यक्रम 'तोडफोड करण्याच्या धमक्यांमुळे' रद्द करण्यात आला. तो म्हणाला, 'माझे नाव मुनव्वर फारुकी आहे आणि माझी निरोप घेण्याची वेळ आली आहे, तुम्ही लोक छान प्रेक्षक होता. बाय. आता निरोप द्या.' फारुकीने लिहिले की, गेल्या दोन महिन्यांत त्याला धमक्यांमुळे १२ शो रद्द करावे लागले. पोस्टच्या शेवटी फारुकीने लिहिने 'द्वेष जिंकला, कलाकार हरला.' या संपूर्ण वादात कुठून आला? अनेक विरोधी पक्षनेते, कार्यकर्त्यांनी फारुकी यांच्या बाजूने पोस्ट टाकल्या. रविवारी फारुकीचे नाव सतत ट्विटर ट्रेंडमध्ये राहिले. मात्र सोमवार सकाळपासून ट्विटरवर 'झाकीर खान' ट्रेण्ड करत आहे. लोक झाकीरचं उदाहरण देऊन समजावून सांगत होते की ही गोष्ट मुल्सिम कॉमेडियन याची नसून तो वापरत असलेल्या कन्टेटची आहे. मुनव्वरच्या पोस्टवर पार्थने लिहिले की, 'तू याचसाठी पात्र आहेस, विशिष्ट धर्मावर विनोद करणं तुझ्यासाठी मजा आहे. तुला वाटतं की कोणी काहीच बोलणार नाही. आम्ही झाकीर खानचा आदर करतो, त्याचा कोणताही शो रद्द होत नाही कारण तो कोणत्याही धर्माला लक्ष्य करत नाही. निखळ कॉमेडी करतो.' कृष्णा नावाच्या अकाउंटने ट्वीट करत लिहिले की, 'मुनव्वर फारुकी हा मुस्लिम असणं ही कधीही समस्या नव्हती. अडचण ही आहे की त्याने हिंदू देवांवर अनेक वेळा विनोद केले. परंतु अल्लाहबद्दल विनोद करण्याचे धाडस केले नाही. झाकीर खानदेखील मुस्लिम आहे आणि तो कॉमेडियन असल्यामुळे सर्वजण त्याच्यावर प्रेम करतात.' अशा अनेक ट्विटमध्ये मुनव्वर फारुकी नव्हे तर झाकीर खानप्रमाणे कॉमेडी करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. फारुकीवर यावर्षी जानेवारी महिन्यात मध्य प्रदेशातील इंदूरमध्ये हिंदू देवता आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर अशोभनीय टिप्पणी केल्याचा आरोप करण्यात आला होता. त्याला इंदूर पोलिसांनी अटकही केली होती. फारुकीवर यापूर्वीही हिंदू देवतांचा अपमान केल्याचा आरोप आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/2Zz7YJf