उत्तर-मुंबई- जोनस लग्नानंतर परदेशात स्थायिक झाली असली तरी ती अजूनही मनाने देसी आहे. बॉलिवूड सुपरस्टारपासून ग्लोबल स्टारचा दर्जा मिळालेल्या प्रियांकाने आपल्या मेहनतीने आणि समर्पणाने हॉलिवूडमध्ये स्वत:ला सिद्ध केलं आहे. विशेष म्हणजे यशाच्या मार्गावर प्रगती करत असलेली प्रियांकाने कधीही आपल्या मातीशी आणि स्वाभिमानाशी तडजोड केली नाही. गेल्या काही वर्षांत असे किमान १० प्रसंग वेगवेगळ्या मुलाखतींमध्ये आले आहेत, जेव्हा तिने परदेशात आपल्या वक्तव्यातून सिद्ध केलं की ती कधीही वायफळ बोलत नाही आणि बोलणाऱ्याचं ऐकूनही घेत नाही. १. एका मुलाखतीत प्रियांका चोप्राला गुगलवर सर्वाधिक सर्च केले जाणारे प्रश्न विचारले जात होते. यात एक प्रश्न होता, 'प्रियांका चोप्रा हिंदी आहे का?' उत्तर- हिंदी ही भाषा आहे. मी हिंदू आहे, जो एक धर्म आहे. दोन्हीमध्ये फरक आहे. थोडा अभ्यास केला तर बरं होईल. २. या मुलाखतीतच, प्रियांका चोप्रा ला अजून एक प्रश्न विचारला गेला तो म्हणजे- प्रियांका चोप्रा मिस युनिव्हर्स होती का? उत्तर- नाही, मी मिस वर्ल्ड २००० होते आणि तुम्हाला हे नक्कीच गुगल केले पाहिजे. ३. प्रियांकाने निक जोनसशी लग्न केल्यानंतर तिच्या नावात 'जोनस' आडनाव जोडलं. एका मुलाखतीत तिला विचारण्यात आले होते की, 'लग्नानंतर तू नाव का बदललं?' उत्तर- मी नाव बदलले आहे, ओळख नाही. माझी स्वतःची एक वेगळी ओळख आहे. मी थोडी पारंपरिक मुलगी आहे. मला स्वतःला प्रियांका चोप्रा- जोनस म्हणवून घ्यायला आवडतं. मी थोडी जुन्या विचारांची आहे. ४. 'द वेंडी विलियम्स शो' मध्ये प्रियांकाला विचारण्यात आले की ती रेड कार्पेटवर एकटी का दिसते, डेटसोबत का येत नाही? उत्तर- तुम्हाला नेहमी डेटची गरज का लागते? रेड कार्पेटवर या गोष्टींची काहीच गरज नाही असे मला नेहमीच वाटतं. एका सशक्त महिलेसारखं माझा वेळ, माझा आउटफिट. इतर गोष्टींची गरज नाही. ५. चेल्सीने प्रियांकाला तिच्या शोमध्ये विचारले, 'बे-वॉचमध्ये तू एकमेव अभिनेत्री होतीस जी समुद्र किनाऱ्यावर स्विमसूट घालून स्लो मोशनमध्ये धावली नाही, यावर तू काय सांगशील?' उत्तर- होय, तुम्ही असं म्हणून शकता की चार महिने चित्रपटासाठी अशा शेपमध्ये राहणं मला शक्य नाही. कदाचित त्या अभिनेत्री काही खात नसतील. ६. त्याच शोमध्ये चेल्सीने प्रियांकाला विचारले, तुला कधी तुझा 'बे-वॉच' को-स्टार झॅक एफ्रॉन किंवा ड्वेन जॉन्सनसोबत रहायला आवडेल का? उत्तर- तू मला असा प्रश्न का विचारतेस? कधीच नाही. हे जरा जास्तच आहे. ७. या शोमध्ये चेल्सीने प्रियांका चोप्राला विचारले, न्यूयॉर्कला येण्यापूर्वी तुला इंग्रजी येत होते का? उत्तर- मी एक वस्तुस्थिती सांगेन. १० टक्के भारतीय अस्खलित इंग्रजी बोलू शकतात. १० टक्के म्हणजे सुमारे १.३ दशलक्ष लोक. जगातील अनेक देशांच्या एकूण लोकसंख्येपेक्षा ही संख्या जास्त आहे. ८. रॅचेल रे शो दरम्यान, प्रियांकाला विचारण्यात आले की 'बे-वॉच' सहकलाकार जॅक आणि द रॉक (दोघेही अतिशय देखणे असल्यामुळे) यांच्याकडे पाहताना ती तिचे संवाद सहज बोलू शकते का? उत्तर- होय अगदी सहज. कारण चित्रपटात मी खलनायक आहे. ९. दुबईतील ग्लोबल एज्युकेशन अँड स्किल्स फोरममध्ये प्रियांका चोप्राला विचारण्यात आले की, 'समजा एखाद्या मुलीने मुलाच्या वात्रटपणामुे त्याच्या कानशिलात लगावली. तुला पुरषांविरुद्धच्या अन्यायावर आवाज उठवताना कधीही पाहण्यात आले नाही. मग यात तुझी समानता कुठे आहे? देव न करो, पण हेच जर पुरुषाने स्त्रीला मारले तर तो गुन्हा मानला जातो. पण पडद्यावर एखादी मुलगी एखाद्या पुरुषाला कानाखाली मारत असेल तर ते योग्य... यात समानता कुठे आली?' उत्तर- स्त्री आणि पुरुष हे शारीरिकदृष्ट्या वेगळे आहेत आणि यात कोणताही वाद नाही. जेव्हा आपण समानता आणि संधीबद्दल बोलतो तेव्हा आपण मानसिकदृष्ट्या समानतेबद्दल बोलत असतो. याचा अर्थ असा नाही की आपल्याला २०० किलोच्या माणसासारखं व्हायचं आहे आणि त्याच्याशी लढायचं आहे आणि त्याला मारायचे आहे. आपण इथे समानतेने नोकऱ्या मिळवण्याबद्दल बोलत आहोत. सीईओ बनण्याबद्दल बोलत आहोत. जेव्हा तुम्ही वयाच्या पन्नाशीत असाल आणि तीन मुलांची आई असाल, तेव्हा तुम्ही हे सगळं कसं सांभाळाल हे कोणीही तुम्हाला विचारणार नाही. मला एवढंच सांगायचं आहे की मी एकाच वेळी सीईओ आणि आई दोन्ही होऊ शकते. म्हणून जेव्हा एखादी मुलगी तिची छेड काढणाऱ्या माणसाच्या कानशिलात लगावते तेव्हा तो त्याचसाठी पात्र असतो. १०. 'द लेट शो विथ स्टीफन कोलबर्ट' मध्ये प्रियांका चोप्राला विचारण्यात आले होते की, 'बॉलिवूड' या शब्दावर तुझा आक्षेप का आहे? उत्तर- अनेक भारतीय कलाकारांना बॉलिवूड हा शब्द आवडत नाही. मला वाटतं की जगात बॉलीवूडचा अर्थ झुंबाचे क्लास इथपर्यंतच मर्यादित राहिलेला आहे. हे असे आहे की तुम्ही कोणालाही थांबवा आणि विचारा की तुम्ही बॉलिवूडबद्दल ऐकले आहे का? त्याचे उत्तर असेल, होय, मी नुकताच एक बॉलिवूडचा क्लास करुन आलो.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3nZmaon