Full Width(True/False)

सहज बनवू शकता स्वतःचा क्यूआर कोड, दुकानदारांना होईल खूपच उपयोग; पाहा प्रोसेस

नवी दिल्ली : सरकार डिजिटल पेमेंटला प्रोत्साहन देत असून, इंटरनेट-स्मार्टफोनमुळे आता ऑनलाइन व्यवहार देखील वढले आहेत. स्मार्टफोनवर उपलब्ध असलेल्या पेमेंट अ‍ॅपच्या माध्यमातून पैसे पाठवणे, रिसिव्ह करणे सोपे झाले आहे. यासाठी क्यूआर कोडचा देखील प्रामुख्याने वापर होतो. अनेक छोट्या-मोठ्या दुकानांवर पाहायला मिळतात. वाचा: क्यूआर कोडमुळे पेमेंट करणे सुरक्षित मानले जाते. तुम्ही स्वतः देखील क्यूआर कोड तयार करू शकता. तुम्ही जर दुकानदार असाल, तर याचा नक्कीच तुम्हाला फायदा होईल. क्यूआर कोड तयार करण्याची प्रोसेस काय आहे, जाणून घेऊया. सर्वात आधी क्यूआर कोड काय आहे व कसे काम करते, हे जाणून घ्या. याचा फुल फॉर्म क्विक रिस्पांस कोड असा आहे. खास माहितीला सांकेतिक शब्दांमध्ये बदलण्यासाठी याचा वापर केला जातो. तुम्ही जर दुकानदार असल्यास क्यूआर कोड जनरेट करण्यासाठी तुमचे बँक अकाउंट असणे गरजेचे आहे. हे खाते भीम अ‍ॅपशी लिंक करून तुमचा यूनिक भारत क्यूआर कोड जनरेट करू शकता. त्यानंतर तो क्यूआर कोड प्रिंट करून तुम्ही दुकानात कोठेही लावू शकता. तुम्ही जर ग्राहक असल्यास क्यूआर कोडच्या मदतीने पेमेंट करण्यासाठी फोनमध्ये बँक अ‍ॅप अथवा इंस्टॉल करावे लागेल. तुम्ही अ‍ॅपद्वारे कोणत्याही दुकानदाराचा क्यूआर कोड स्कॅन करून पेमेंट करू शकता. इतरही लोक तुमच्या फोनमधील क्यूआर कोड स्कॅन करून तुम्हाला पैसे पाठवू शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3ojugXX