नवी दिल्ली : टेक कंपनी गुगलने मे महिन्यात घोषणा केली होती की, २०२१ च्या अखेरीस अकाउंटवर लॉग इन करण्याची पद्धत बदलणार आहे. सर्व यूजर्ससाठी प्रोसेस अनिवार्य केली जाणार आहे. ९ नोव्हेंबरपासून यूजर्सला लॉग इनसाठी टू-स्टेप व्हेरिफिकेशनचा वापर करावा लागेल. यामुळे अकाउंट अधिक सुरक्षित होईल. वाचा: यावर्षाच्या सुरुवातीला अपडेटची घोषणा करताना गुगलने आपल्या ब्लॉग पोस्टमध्ये म्हटले होते की, २०२१ च्या अखेरीस आम्ही ला अतिरिक्त १५ कोटी गुगल यूजर्ससाठी ऑटो-एनरोल करणार आहोत. तसेच, २ मिलियन युट्यूब क्रिएटर्ससाठी देखील ही सुविधा उपलब्ध केली जाईल. टू-स्टेप व्हेरिफिकेशनमुळे तुमचे अकाउंट अधिक सुरक्षित होईल. या पर्यायामुळे युजर्सला गुगल अकाउंट लॉग इन करताना वन-टाइम पासवर्डसह एक एसएमएस अथवा ईमेल येईल. या ओटीपीचा वापर करूनच अकाउंट लॉग इन करता येईल. यामुळे अकाउंटला अतिरिक्त सुरक्षा मिळेल व खासगी डेटा सुरक्षित राहील. रिपोर्टनुसार, गुगल टू-स्टेप व्हेरिफिकेशनला अधिक सक्षम करण्यासाठी सर्व यूजर्सला ईमेल अथवा इन-अ‍ॅप व्हेरिफिकेशन पाठवत आहे. मेसेजमध्ये म्हटले आहे की, व्हेरिफिकेशन प्रोसेस इनेबल नसल्यास ९ नोव्हेंबरपासून आपोआप सुरू होईल. पासवर्ड टाकल्यानंतर फोनवर दुसरी स्टेप पूर्ण करावी लागेल. यासाठी लॉग इन करताना फोन जवळ असणे गरजेचे आहे. ९ नोव्हेंबरपासून टू-स्टेप व्हेरिफिकेशन सुरू होईल. यूजर्स स्वतः देखील हे फीचर सुरू करू शकतात. असे इनेबल करा टू-स्टेप व्हेरिफिकेशन
  • सर्वात प्रथम गुगल अकाउंट उघडा.
  • आता नेव्हिगेशन पॅनेलमधील सिक्योरिटी पर्याय निवडा.
  • येथे तुम्हाला टू-स्टेप व्हेरिफिकेशन पर्याय दिसेल, तो निवडा.
  • त्यानंतर ऑन-स्क्रीन अकाउंट्स फॉलो करा.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3bKvUfa