Full Width(True/False)

चीनच्या सीमेवर मोबाइल खणखणणार, लडाखच्या डेमचोकमध्ये रिलायन्स जिओने केला कारनामा

नवी दिल्ली : चीनच्या सीमेला लागून असलेल्या लडाखच्या या दुर्गम सीमावर्ती गावात पहिल्यांदाच मोबाईलची रिंग खणखणत आहे. डेमचोकमध्ये उभारण्यात आलेल्या रिलायन्स जिओच्या मोबाइल टॉवरमुळे या भागात पोहचली आहे. अनेक वर्षांपासून या भागातील लोक कनेक्टिव्हिटीचा भाग पाहत होते. पहिल्यांदा लोक ४जी वॉइस आणि डेटा मोबाइल नेटवर्कशी जोडले गेले आहेत. लेहचे खासदार जामयांग त्सेरिंग नामग्याल यांनी मोबाइल टॉवरचे उद्घाटन केले. वाचा: वेळेवर मोबाइल टॉवरचे काम पूर्ण करण्यासाठी खासदारांनी रिलायन्स जिओच्या अधिकाऱ्यांचे आभार मानले. ते म्हणाले की, हा टॉवर या भागासाठी नक्कीच फायद्याचा ठरेल. दरम्यान, या भागात बर्फवृष्टी आणि खराब हवामानामुळे वर्षभरात केवळ ६ ते ७ महिनेच काम होते. डेमचोकसह लद्दाखमधील सीमावर्ती गाव चुशुल, न्योमा थारूक आणि दुरबुकमध्ये देखील ४जी सेवांचे उद्घाटन केले गेले. लद्दाखमध्ये रिलायन्स जिओच्या १६८ मोबाइल टॉवर्सचे काम सुरू आहे. सियाचिन बेस कॅम्स आणि जांस्कर रिजमध्ये जिओ एकमात्र टेलिकॉम नेटवर्क ऑपरेटर आहे. संकू, तैफसुरु, शार्गोल, नुब्रा, खालसी, खारू, द्रास, पनामिक सारख्या दुर्गम भागातील विविध गावांना जिओ नेटवर्कद्वारे आधीच कव्हर करण्यात आले आहे. इतर दुर्गम भागातील गावांपर्यंत नेटवर्क पोहचवण्याचे काम सुरू आहे. जिओला सरकारी USOF अंतर्गत ६२ टॉवर्स उभारण्याचे काम मिळाले आहे, यातील ४४ टॉवर्स कार्यरत झाले आहेत. कोणत्या स्थितीमध्ये या भागात नेटवर्क टिकून राहावे यासाठी जिओने लद्दाखला तीन वेगवेगळ्या फायर रुट्सने जोडले आहे. लेह-श्रीनगर, लेह-मनाली आणि लेह-गुरेज हे तीन फायबर केबल रुट्स आहे. दोन रुट्स सध्या चालू असून, लेह-गुरेज लवकरच सुरू होण्याची शक्यता आहे. डेमचोकमध्ये जिओ ४जी सेवेची सुरुवात केंद्रशासित प्रदेशातील लोक व पर्यटन उद्योगासाठी फायद्याचे ठरणार आहे. यामुळे या भागात आरोग्य व शिक्षणा क्षेत्राच्या माध्यमातून लोकांच्या जीवनात बदल होईल. आर्थिक विकासाच्या दृष्टीने देखील याचे महत्त्व आहे व यामुळे स्थानिक युवक आणि व्यापाऱ्यांना उत्पन्नाची संधी निर्माण होईल. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3GLZC1K