Full Width(True/False)

Motorola चा बजेट 5G स्मार्टफोन Moto G51 5G येतोय, कमी किंमतीत मिळतील शानदार फीचर्स

नवी दिल्लीः या महिन्यात लाँच होण्याची शक्यता आहे. लाँच आधीच फोनला थायलँडच्या वेबसाइट वर पाहिले गेले आहे. या लेटेस्ट सर्टिफिकेशनवरून उघड झाले की, Moto G51 5G ची लाँचिंग आता फार लांब नाही. फोनला आधीही अनेक ठिकाणी लीक करण्यात आले आहे. याला चीनच्या 3C आणि US' FCC सारख्या अन्य सर्टिफिकेशन साइटवर पाहिले गेले आहे. याआधी संकेत मिळाले आहेत की, Moto G51 5G जगभरातील बाजारपेठेतील बाजारात लाँचिंगसाठी तयार आहे. तर, टिप्सटर अभिषेक यादव ने Moto G51 5G ला सर्टिफिकेशन साइट वर मॉडल नंबर XT2171-2 सोबत पाहिले गेले आहे. या मॉडलला चीनमध्ये 3C सर्टिफिकेशन साइट वर पाहिले गेले आहे. NBTC सर्टिफिकेशन वरून फोनसंबंधी कोणतीही माहिती मिळाली नाही. परंतु, संकेत मिळाले आहेत की, हँडसेट लाँच होवू शकतो. गेल्या रिपोर्टनुसार, नोव्हेंबरमध्ये लाँचिंग होण्याची शक्यता आहे. याचाच अर्थ लवकरच Moto G51 5G टीझ करणे सुरू करू शकतो. 5G चे संभावित फीचर्स Moto G51 5G ला याआधी सुरुवातीला गीकबेंचवर पाहिले गेले आहे. लिस्टिंगवरून हे उघड झाले आहे की, अपकमिंग फोन क्वॉलकॉम स्नॅपड्रॅगन 750G SoC वर चालू शकतो. ज्याला ४ जीबी रॅम सोबत जोडले जावू शकते. गीकबेंचच्या माहितीनुसार, स्मार्टफोनच्या अँड्रॉयड ११ आउट ऑफ द बॉक्सवर काम करण्याची शक्यता आहे. Moto G51 5G ला नुकतेच ३ सी सर्टिफिकेशन साइटवर पाहिले गेले होते. यावरून माहिती होते की, फोन 10W चार्जिंग सपोर्ट सोबत येवू शकतो. यावरून उघड झाले की, Moto G51 5G एक बजेट फोन असू शकतो. एका मागील रिपोर्टनुसार, फोनचे कोडनेम 'साइप्रस 5जी' असू शकतो. यात ट्रिपल रियर कॅमेरा सोबत १३ मेगापिक्सलचा सेल्फी शूटर असू शकतो. ज्यात ५० मेगापिक्सलचा प्रायमरी सेन्सर, ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल सेन्सर आणि २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर दिला आहे. याशिवाय, Moto G51 5G मध्ये फुल-एचडी+ डिस्प्ले असू शकतो. वाचा: वाचा: : वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/31slqzh