Full Width(True/False)

एका तासात रेडमी सीरीजच्या या फोनची ५ लाखांहून जास्त विक्री, आज होता पहिला सेल

नवी दिल्लीः Xiaomi ने काही दिवसांपूर्वी सीरीजला लाँच केले होते. चीनमध्ये लाँच करण्यात आलेल्या या सीरीज अंतर्गत तीन स्मार्टफोन रेडमी नोट 11, नोट 11 प्रो आणि नोट 11 प्रो+ येतात. कंपनीने या नवीन सीरीजच्या स्मार्टफोन्सला युजर्संकडून जबरदस्त रिस्पॉन्स मिळाला आहे. कंपनीने दावा केला आहे की, पहिल्या सेलमध्ये केवळ एका तासात या सीरीजचे ५ लाखांहून जास्त स्मार्टफोनची विक्री झाली आहे. कंपीने या नवीन स्मार्टफोनला आज चीनमध्ये पहिल्यांदा विक्रीसाठी उपलब्ध केले होते. रेडमी नोट 11 सीरीजचे फीचर आणि स्पेसिफिकेशन या सीरीजच्या रेडमी नोट ११ स्मार्टफोनमध्ये 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन सोबत ६.६ इंचाचा डिस्प्ले दिला आहे. हा डिस्प्ले 90Hz च्या रिफ्रेश रेट सोबत येतो. तर नोट ११ सीरीजच्या दोन्ही प्रो व्हेरियंटमध्ये तुम्हाला 2400x1080 पिक्सल रेजॉलूशन आणि 120Hz च्या रिफ्रेश रेट सोबत ६.६७ इंचाचा Samsung AMOLED डिस्प्ले दिला आहे. रेडमी नोट ११ प्रो आणि प्रो प्लस मध्ये कंपनी मीडियाटेक डायमेंसिटी 920 5G चिपसेट देत आहे. तर फोनचा बेस व्हेरियंट मीडियाटेक डाइमेंसिटी 810 5G चिपसेट येतो. फोटोग्राफीसाठी रेडमी नोट ११ मध्ये ५० मेगापिक्सलचा प्रायमरी कॅमेरा दिला आहे. जो ८ मेगापिक्सलचा अल्ट्रा वाइड अँगल कॅमेरा सोबत येतो. रेडमी नोट ११ प्रो आणि नोट ११ प्रो प्लस मध्ये तुम्हाला १०८ मेगापिक्सलचा अल्ट्रा क्लियर प्रायमरी कॅमेरा सोबत एक ८ मेगापिक्सलचा सुपर वाइड अँगल लेन्स आणि एक २ मेगापिक्सलचा मायक्रो सेन्सर मिळणार आहे. सेल्फीसाठी या तिन्ही स्मार्टफोनमध्ये १६ मेगापिक्सलचा कॅमेरा दिला आहे. फोनचे बेस व्हेरियंट मध्ये 5000mAh ची बॅटरी दिली आहे. ३३ वॉट ची फास्ट चार्जिंग सपोर्ट करते. रेडमीच्या या सीरीजला प्रो मॉडल मध्ये ६७ वॉटची फास्ट चार्जिंग सोबत 5,160mAh आणि नोट ११ प्रो प्लस मध्ये १२० वॉटची फास्ट चार्जिंग सोबत 4500mAh ची बॅटरी ऑफर करीत आहे. या तिन्ही स्मार्टफोन अँड्रॉयड ११ वर बेस्ड MIUI 12.5 आउट-ऑफ-द-बॉक्स वर काम करतो. वाचा: वाचा: वाचा: ' वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3CAFMUz