Full Width(True/False)

'नको तिथे नाक खूपसू नका', पाकिस्तानला अदनान सामीने सुनावले

मुंबई- बॉलिवूडचे लोकप्रिय गायक आणि संगीतकार यांचा नुकताच पद्मश्री पुरस्कार देऊन सन्मान करण्यात आला. यानंतर पाकिस्तानातील एक मोठा समूह अदनान यांचा विरोध करत आहे. त्यांना ट्रोल करत आहे. त्याचं महत्वाचं कारण म्हणजे अदनान यांनी सोडलेली पाकिस्तानी नागरिकता. अदनान यांनी भारतीय नागरिकत्वाचा स्वीकार केल्यापासून पाकिस्तानी नागरिकांकडून त्यांना अनेकदा ट्रोल केलं जातं. नुकत्याच दिलेल्या मुलाखतीत अदनान यांनी अशाच काही ट्रोलर्सना उत्तर देत काही महत्वाच्या विषयावर भाष्य केलं. एका मुलाखतीत अदनान यांनी त्यांच्या त्या ट्विटबद्दल स्पष्टीकरण दिलं ज्यामुळे सोशल मीडियावर त्यांना ट्रोल केलं गेलं होतं. अदनान यांनी लिहिलेलं, 'सीएए या कायद्याशी माझा काहीही संबंध नाही. माझ्या आसपासच्या लोकांचाही याच्याशी काही संबंध नाही. माझ्या भारतीय नागरिकत्वासोबतही याचा संबंध नाही.' या विषयावर बोलताना अदनान म्हणाले, 'ती तेव्हा पाकिस्तानी लोकांना सांगितलेलं की हा भारताचा अंतर्गत मुद्दा आहे. पाकिस्तानचा याच्याशी संबंध नाही. त्यामुळे शेजाऱ्यांनी उगीच भारताच्या अंतर्गत मुद्द्यात नाक खुपसू नये.' याशिवाय अदनान यांना पद्मश्री चमचेगिरी करून मिळाला असल्याचं देखील ट्रोल करणाऱ्यांचं म्हणणं होतं. यामुद्द्यावर बोलताना अदनान म्हणाले, 'हा मूर्खपणा आहे. मला एखादा व्यक्ती आवडतो म्हणून मी त्याचा चमचा नाही होतं. असंही होऊ शकतं की मला तुमची निवड आवडली नाही. तरीही मी तुमच्या निवडीसाठी लढेन.' यासोबतच अदनान यांनी अभिनेत्री कंगना रणौत हिने केलेल्या वादग्रस्त वक्तव्याबद्दल भाष्य केलं. कंगना म्हणाली होती की, भारताला स्वातंत्र्य २०१४ साली मिळालं. १९४७ मिळाली ती भीक होती. कंगनाच्या या वक्तव्यावर अदनान म्हणाले, 'भारताबद्दल एक चांगली गोष्ट अशी आहे की तुम्ही लोकशाहीत आहात. तुम्हाला जे वाटेल ते बोलू शकता. करू शकता. कंगनाला जे योग्य वाटलं ती ते बोलली. मी तिच्या मताशी सहमत असेनही किंवा नसेनही.'


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3D98Kus