Full Width(True/False)

तेलगू कोरिओग्राफर शिवा शंकर यांचं करोनाने निधन

हैदराबाद- तेलगू सिनेसृष्टीतील प्रसिद्ध कोरिओग्राफर यांचे हैद्राबाद येथील इस्पितळात निधन झाले. गेल्या काही दिवसांपासून शिवा शंकर यांच्यावर करोनावरील उपचार सुरू होते. या उपचारांसाठी अभिनेता ने आर्थिक मदतही केली होती. अनेक अभिनेते आणि चित्रपट निर्मात्यांनी शिवा यांच्या निधनावर शोक व्यक्त केला आहे. सोनूने शिवा यांचा फोटो शेअर करत एक भावनिक नोटही शेअर केली आहे. विषाणूची लागण झाल्यानंतर शिवशंकर यांची प्रकृती खालावत गेली. त्यांच्या मोठ्या मुलालाही करोनाची लागण झाली असून त्याच्यावरही उपचार सुरू आहेत. रविवारी रात्री शिवा शंकर यांच्या निधनानंतर सोनूने ट्वीट करत म्हटले की, 'शिवशंकर मास्टर जी यांच्या निधनाच्या वृत्ताने माझे मन दुःखी झाले आहे. मी त्यांना वाचवण्याचा सर्वतोपरी प्रयत्न केला पण देवाला काही वेगळेच मंजूर होते. मला मास्तरजींची नेहमीच आठवण येईल. देव त्यांच्या कुटुंबीयांना हे दुःख सहन करण्याची शक्ती देवो. सिनेमा तुम्हाला कधीच विसरणार नाही सर.' तेलगू दिग्दर्शक एसएस राजामौली यांनीही ट्वीट करून शोक व्यक्त केला, 'प्रसिद्ध नृत्यदिग्दर्शक शिवशंकर मास्टर गारू यांचे निधन झाले हे जाणून दुःख झाले. 'मगधीरा' मध्ये त्यांच्यासोबत काम करणे हा एक संस्मरणीय अनुभव होता. त्यांच्या आत्म्याला शांती लाभो. त्यांच्या कुटुंबाप्रती माझ्या संवेदना.' दरम्यान, करोनाची लागण झाल्यानंतर शिवा यांना तातडीने इस्पितळात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावरील उपचारांसाठी सोनू सूद मदतीसाठी पुढे आला होता. सोनूशिवाय अभिनेता धनुषही शंकर यांच्या मदतीसाठी पुढे आला आणि त्यानेही आर्थिक मदत केली होती. शिवा शंकर यांनी नृत्य दिग्दर्शनाव्यतिरिक्त तेलगू आणि तमिळ चित्रपटांमध्ये कामही केले आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pbExFU