Full Width(True/False)

‘हे’ राज्य सरकार विद्यार्थ्यांना मोफत देणार स्मार्टफोन-टॅबलेट, जाणून घ्या कशी करता येईल नोंदणी

नवी दिल्ली : सरकार राज्यातील एक कोटी कॉलेज विद्यार्थ्यांना मोफत आणि वाटणार आहे. सध्या या योजनेवर काम सुरू आहे. उत्तर प्रदेश सरकार तंत्रज्ञान, वैद्यकीय आणि नर्सिंग संस्थांमधील पदवीधर आणि पदव्युत्तर विद्यार्थ्यांना मोफत डिव्हाइस देण्याच्या योजनेवर काम करत आहे. केवळ कौशल्य विकास कार्यक्रमात नोंदणी केलेल्यांनाच डिव्हाइस वितरित केले जाण्याची शक्यता आहे. वाचा: उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री यांनी यासंदर्भात एका बैठकीत अधिकाऱ्यांशी चर्चा केली आहे. या बैठकीत योग्य विद्यार्थ्यांची यादी तयार करण्याचे आदेश दिले असून, जेणेकरून नोव्हेंबर अखेरपर्यंत विद्यार्थ्यांना स्मार्टफोन व टॅबलेट वाटले जातील. रिपोर्टनुसार, मुख्य सचिव आर के तिवारी म्हणाले की, डिव्हाइस विद्यार्थ्यांना डिजिटली सक्षम बनविण्यास मदत करेल व त्यांच्यासाठी नोकरीच्या संधी उपलब्ध होतील. त्यांनी राज्यातील विद्यापीठाशी संलग्न कॉलेजला नोंदणी केलेल्या विद्यार्थ्यांची माहिती गोळा करण्यास सांगितले आहे. सोबतच, ही माहिती जिल्हाधिकारी कार्यालयाला पाठविण्याचे निर्देश दिले आहेत. कार्यालय इंडस्ट्रियल डेव्हलपमेंट डिपार्टमेंटच्या आदेशांतर्गत जिल्हा स्तरावर माहितीची पडताळणी करेल व त्यानंतर डिव्हाइस वाटले जातील. दरम्यान, उत्तर प्रदेशच्या मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती, सुल्तानपूर येथे सरकारी मेडिकल कॉलेजची पायभरणी केली जाईल. यावेळी विद्यार्थ्यांना डिव्हाइस वाटले जातील. या अंतर्गत नोव्हेंबरच्या अखेरच्या आठवड्यात टॅबलेट, स्मार्टफोनचे वाटप सुरू केले जाईल. ऑगस्टमध्ये विधानसभेत बजेट सादर केल्यानंतर ही घोषणा सरकारने केली होती. सरकारने डिव्हाइसच्या खरेदीसाठी ३ हजार कोटी रुपये निश्चित केले होते. सरकारने २५ लाख स्मार्टफोन आणि टॅबलेटच्या खरेदीसाठी निविदा मागवल्या आहेत. याशिवाय दहावी आणि बारावीत चांगली कामगिरी करणाऱ्या विद्यार्थ्यांना मोफत लॅपटॉप देण्याचा देखील सरकारचा विचार आहे. सरकार यासाठी २० लाख मोफत लॅपटॉप देण्याच्या योजनेवर काम करत आहे. जे विद्यार्थी डिव्हाइस खरेदी करू शकत नाही, त्यांना याचा लाभ मिळेल. विद्यार्थी www.upcmo.up.nic.in या वेबसाइटवर नोंदणी करून देखील योजनेचा लाभ घेऊ शकतील. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3n0XMSH