मुंबई- सध्या बॉलिवूडमध्ये लग्नाचा सीजन सुरू आहे. गेल्या काही महिन्यात अनेक बॉलिवूड अभिनेते आणि अभिनेत्री लग्नबंधनात अडकले. बॉलिवूड अभिनेत्री आणि ही चाहत्यांची प्रचंड आवडती जोडी आहे. रणबीर आणि आलिया गेले काही वर्ष रिलेशनशिपमध्ये आहेत. त्यामुळे चाहत्यांना रणबीर आणि आलियाच्या लग्नाचे वेध लागले आहेत. सध्या सुरू असलेल्या लग्नसराईच्या वातावरणात रणबीर आणि आलियादेखील लग्नाच्या बेडीत अडकतील असा चाहत्यांचा अंदाज होता. मात्र आलिया आणि रणबीर यांनी पुन्हा एकदा त्यांच्या लग्नाची तारीख पुढे ढकलल्याने चाहत्यांचा भ्रमनिरास झाला आहे. रणबीरने दिलेल्या एका मुलाखतीत त्याने म्हटलं होतं की, तो आणि आलिया २०२० साली लग्न करणार होते. मात्र करोनाच्या लाटेमुळे त्यांचा निर्णय रद्द करावा लागला. आता सगळं काही सुरळीत सुरू असल्याचं चित्र आहे. मात्र आलिया आणि रणबीर दोघेही त्यांच्या पुढील चित्रपटांच्या चित्रीकरणात व्यग्र आहेत. रणबीर आणि आलिया दोघांनाही डेस्टिनेशन वेडिंग करायचं आहे. त्यामुळे लग्नाचं ठिकाण, तयारी यात फार वेळ जाणार आहे. सोबतच आलिया आणि रणबीरला अगदी धुमधडाक्यात लग्न करायचं असल्याने दोघेही बाहेरचं वातावरण नियंत्रणात येण्याची वाट पाहत आहेत. त्यामुळेच रणबीर आणि आलिया दोघांनी त्यांचं लग्न पुढील वर्षीच्या डिसेंबर महिन्यात करायचं ठरवलं आहे. याशिवाय या डिसेंबर महिन्यात बॉलिवूडची लाडकी अभिनेत्री कतरिना कैफ आणि विकी कौशल लग्नगाठ बांधणार आहेत. त्यामुळे एकाच महिन्यात दोन मोठी लग्न न करण्याचा निर्णय रणबीर आणि आलियाने घेतला आहे. रणबीर आणि आलिया यांच्या घराचं कामही वेगात सुरू आहे. आलिया लवकरच 'आरआरआर', 'गंगुबाई काठियावाडी', 'रॉकी और राणी की प्रेम कहानी' या चित्रपटात दिसणार आहे.
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3pbzplk