मुंबई- बॉलिवूड अभिनेत्री सध्या '' मध्ये स्वतःचं अस्तित्व सिद्ध करताना दिसतेय. शमिताचा खेळ पाहून नेटकरीही चकीत झाले आहेत. शमिताला मोठ्या प्रमाणात चाहत्यांचा पाठिंबा मिळत आहे. मात्र अशातही काही युझर्स शमिताला ट्रोल करताना दिसत आहेत. शमिताला घरात मिळालेले विशेषाधिकार काही नेटकऱ्यांना पसंत पडलेले नाहीत. त्यामुळे शमिताला सोशल मीडियावर ट्रोल केलं जातंय. आता बॉलिवूड अभिनेत्री आपल्या बहिणीच्या समर्थनार्थ पुढे सरसावली आहे. शमिताला लहानपणापासूनच खूप सुविधा मिळाल्या आहेत, ती दुसऱ्यांवर हुकूम चालवणारी आहे, असं म्हणणाऱ्या नेटकऱ्यांना शिल्पाने एका पोस्टद्वारे उत्तर दिलं आहे. शिल्पाने शमिताचा एक व्हिडीओ शेअर करत लिहिलं, 'हे माझ्या धैर्यवान बहिणीसाठी आहे. मला हे सगळं बघून खूप वाईट वाटतं की कशाप्रकारे शमिताला टारगेट केलं जातंय. शमिताच्या वागण्याला तिचा अहंकार म्हटलं जातंय. शमिताला तिचं मत नाही, ती डोक्याने खेळत नाही, असे आरोप केले जातायत. मला या सगळ्यांना सांगायचंय की जर तिला बिग बॉस कडून कोणतेही विशेष अधिकार मिळाले असते तर तिने स्वतःची इमेज खराब करून घरात राहण्यासाठी धडपड केली नसती. शमिता खरी आहे. आणि हीच तिची ताकद आहे.' पुढे शिल्पाने लिहिलं, 'मला या खेळाच्या स्ट्रॅटेजीबद्दल काही माहीत नाही पण शमिता जे समोर दिसतंय त्यावर व्यक्त होतेय. प्रत्येक व्यक्ती वेगळी असते. आम्ही काही श्रीमंत म्हणून जन्माला आलो नव्हतो. आम्ही दोघींनीही खूप मेहनत केलीये. आम्ही एका मध्यमवर्गीय घरात वाढलेल्या मुली आहोत. आमच्यासाठी आमचा मान आणि मर्यादा सगळ्यात पुढे आहेत. हेच आम्हाला शिकवलं गेलंय. एका खेळासाठी वाट्टेल ते ऐकून घेणार नाही. आणि शमिता तेच करतेय. शमितादेखील तिच्या प्रामाणिकपणा, मर्यादा, मान, स्वाभिमान आणि क्लाससाठी प्रेक्षकांच्या लक्षात राहील.'
from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3HYHWjY