नवी दिल्ली : तुम्ही जर नवीन स्मार्ट टीव्ही खरेदी करण्याचा विचार करत असाल तर तुमच्याकडे चांगली संधी आहे. ५५ इंच स्मार्ट अँड्राइड टीव्हीला तुम्ही अर्ध्या किंमतीत खरेदी करू शकता. वाचा: ई-कॉमर्स वेबसाइट वर Premium 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED अर्ध्या किंमतीत खरेदी करण्याची संधी आहे. या टीव्हीला तुम्ही ईएमआयवर खरेदी करू शकता. तसेच, यावर एक्सचेंज ऑफरचा देखील लाभ मिळेल. या ऑफर्सविषयी सविस्तर जाणून घेऊया. Vu Premium 139 cm (55 inch) Ultra HD (4K) LED Smart Android TV ची किंमत आणि ऑफर्स या स्मार्ट टीव्हीची मूळ किंमत ७५,००० रुपये आहे. ४८ टक्के डिस्काउंटनंतर ३८,९९९ रुपयात खरेदी करू शकता. तुम्ही टीव्हीला ईएमआयवर देखील खरेदी करू शकता. टीव्हीला १,९९९ रुपये देऊन खरेदी करू शकता. तसेच, एसबीआय क्रेडिट कार्डने पेमेंट केल्यास १० टक्के अतिरिक्त सूट मिळेल. याशिवाय Flipkart Axis बँक क्रेडिट कार्डचा वापर केल्यास ५ टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. तसेच, जुन्या टीव्हीवर ११ हजार रुपयांपर्यंत डिस्काउंट मिळेल. पूर्ण एक्सचेंज ऑफर्सचा लाभ मिळाल्यास टीव्ही २७,९९९ रुपयात खरेदी करू शकता. फीचर्स: टीव्हीमध्ये ५५ इंच Ultra HD (4K) डिस्प्ले दिला असून, याचे पिक्सल रिझॉल्यूशन ३८४०x२१६० आहे. याचा साउंड आउटपूट ३० वॉट आहे. याचा रिफ्रेश रेट ६० हर्ट्ज आहे. यामध्ये Netflix, Prime Video, Disney+Hotstar, Youtube सारख्या अ‍ॅप्सचा सपोर्ट मिळतो. टीव्ही अँड्राइड ११ वर काम करतो. यात गुगल असिस्टेंट आणि क्रोमकास्ट इन-बिल्ट आहे. वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/2ZX6IQz