Full Width(True/False)

सावत्र आईला घरी आणल्यावर रागावलेला सलमान खान

मुंबई- आपल्या लेखणीने बॉलीवूडला अनेक दर्जेदार चित्रपट देणारे आणि अभिनेता याचे वडील यांचं वैयक्तिक आयुष्यही एखाद्या चित्रपटांप्रमाणेच आहे. सलीम जेव्हा सलमानच्या सावत्र आईला घरी घेऊन आले तेव्हा घरातील सर्वांनाच मोठा धक्का बसला होता. सलमान अभिनेत्री यांना पाहून रागाने लाल झाला होता. परंतु, सलीम यांच्या वागण्याचं सलमानला जास्त वाईट वाटलं होतं. हेलन या बॉलिवूडमधील अतिशय ग्लॅमरस अभिनेत्रींनपैकी एक होत्या. अनेक प्रेक्षक फक्त त्यांच्यासाठी चित्रपटगृहांमध्ये गर्दी करत. परंतु, हेलन यांना त्यांच्या पतीकडून झालेली फसवणूक सहन झाली नाही. हेलन यांच्या पतीने त्यांची संपूर्ण संपत्ती विकून टाकली होती. त्यानंतर हेलन फार एकट्या पडल्या. त्या काळात सलीम यांनी हेलन यांना सावरलं. सलीम यांच्यामुळे हेलन यशाचं शिखर गाठू शकल्या. परंतु, पुढे या मैत्रीचं रूपांतर प्रेमात झालं. एकेदिवशी सलीम हेलन यांना लग्न करून घरी घेऊन आले. हे पाहून सलमानसोबत सोहेल, अरबाज आणि अलवीरा या सगळ्यांनाच धक्का बसला. परंतु, त्यामुळे सलमानची आई नैराश्यात गेली. आपल्या आईची ही अवस्था पाहून इतर मुलांप्रमाणेच सलमानही हेलन यांचा तिरस्कार करू लागला. वडिलांवरचा त्याचा राग वाढतच गेला. मात्र हेलन यांनी हार न मानता सलमानसह संपूर्ण कुटुंबाला आपलंस केलं. हळूहळू सलमान आणि इतरांनी हेलन यांचा स्वीकार केला. पहिल्यांदा सावत्र आईला पाहिल्यावर रागाने लाल झालेला सलमान आज दोन्ही आईंसोबत आनंदाने राहत आहे.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3DO1fKx