Full Width(True/False)

तुमच्या गुगल अकाउंटशी लिंक आहेत थर्ड पार्टी अ‍ॅप्स? या सोप्या स्टेप्सचा वापर करून हटवा अ‍ॅक्सेस

नवी दिल्ली : स्मार्टफोनमुळे बँकिंग, रिचार्ज आणि चॅटिंगसह अनेक कामे सोपी झाली आहेत. ही कामे करण्यासाठी आपल्याला अ‍ॅप्सवर निर्भर राहावे लागते. मात्र, अनेकदा आपण विसरतो की, काही बनावट अ‍ॅप्समुळे सुरक्षेचा धोका निर्माण होतो. वाचा: आपण शॉपिंग, स्टडी, सोशल मीडियाशी संबंधित अनेक अ‍ॅप्सचा वापर करतो व या अ‍ॅप्सला साइन-अपचा अ‍ॅक्सेस देतो. मात्र, हे सुरक्षित नसून, डिव्हाइसला हॅकर्सपासून वाचवण्यासाठी काही गोष्टींची काळजी घेणे गरजेचे आहे. स्मार्टफोनमधील थर्ड पार्टी अ‍ॅप्सला त्वरित डिलीट करावे. तुमच्या फोनमधील थर्ड पार्टी अ‍ॅप्स जेवढे कमी अकाउंटशी कनेक्ट असतील, तेवढीच हॅकिंगची शक्यता कमी होते. तुम्ही खाली दिलेल्या स्टेप्सचा वापर करून थर्ड पार्टी अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस हटवू शकता.
  • फोन वापरत असाल तर सर्वात प्रथम सेटिंग्समध्ये जा.
  • Settings मध्ये Google Account या पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्ही सर्व अ‍ॅप्सची माहिती मिळेल.
  • आता ज्या अ‍ॅप्सचा गुगल अ‍ॅक्सेस काढायचा आहे त्यावर क्लिक करा.
  • सिक्योरिटी सेक्शमध्ये जा आणि अकाउंट अ‍ॅक्सेससह थर्ड पार्टी अ‍ॅपवर क्लिक करा.
  • आता मेनेज थर्ड पार्टी अ‍ॅप अ‍ॅक्सेसवर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला त्या अ‍ॅप्सची माहिती मिळेल, ज्यांना तुम्ही गुगलचा वापर करून लॉग इन केले आहे.
  • आता ज्या अ‍ॅप्सचा अ‍ॅक्सेस हटवायचा आहे त्यावर क्लिक करा.
अँड्राइड स्मार्टफोनने असा हटवा थर्ड पार्टी अ‍ॅक्सेस
  • अँड्राइड फोनला इंटरनेटशी कनेक्ट करा.
  • आता Google suite चा भाग असलेले Google अ‍ॅप उघडा.
  • उजव्या बाजूला असलेल्या गुगल अकाउंट आयकॉनवर टॅप करा.
  • आता Manage your Google Account वर टॅप करा.
  • त्यानंतर सिक्योरिटीमध्ये जा.
  • येथून तुम्ही अ‍ॅक्सेस काढून घेऊ शकता.
लॅपटॉप आणि टॅबलेटवरून असा काढा थर्ड पार्टी अ‍ॅक्सेस
  • गुगल क्रोम अथवा तुमच्या ब्राउजरमध्ये गुगल अकाउंट ओपन करा.
  • त्यानंतर ब्राउजरवर एक नवीन टॅब उघडा.
  • आता अकाउंटच्या उजव्या बाजूला क्लिक करा.
  • त्यानंतर Manage your Google Account वर टॅप करा.
  • येथे Security पर्यायावर क्लिक करा.
  • येथे तुम्हाला सर्व अ‍ॅप्सचा माहिती मिळेल.
  • त्यानंतर ज्या अ‍ॅप्सचा गुगल अ‍ॅक्सेस काढायचा आहे त्यावर क्लिक करा.
वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3pWkzRp