Full Width(True/False)

अ‍ॅमेझॉन अ‍ॅप क्विज २२ नोव्हेंबर २०२१: २५ हजार रुपये जिंकण्याची संधी, द्या ‘या’ ५ सोप्या प्रश्नांची उत्तरे

नवी दिल्ली : अ‍ॅमेझॉनच्या डेली अ‍ॅप क्विजला पुन्हा एकदा सुरुवात झाली असून, आजच्या क्विजमध्ये सहभागी होणाऱ्यांना स्वरुपात २५ हजार रुपये जिंकण्याची संधी आहे. या क्विजमध्ये यूजर्सला ५ प्रश्न विचारले जातात. बक्षीस जिंकण्यासाठी यूजर्सला पाचही प्रश्नांची अचूक उत्तरे देणे गरजेचे आहे. हे प्रश्न सामान्य ज्ञान आणि चालू घडामोडींवर आधारित असते. वाचा: या क्विजमध्ये यूजर्स च्या अँड्राइड आणि आयओएस मोबाइल अ‍ॅपद्वारे सहभागी होऊ शकतील. क्विजला रात्री १२ वाजता सुरुवात होते व यूजर्स पुढील २४ तास यात भाग घेऊ शकतात. क्विजमध्ये लकी ड्रॉच्या माध्यमातून एका विजेत्याची निवड केली जाते. आजच्या क्विजमध्ये विचारलेले प्रश्न व त्याची उत्तरे 1. भारतात १४ नोव्हेंबरला बालदिन साजरा केला जातो. मात्र, संयुक्त राष्ट्राद्वारे जागतिक बालदिन कधी साजरा केला जातो? उत्तर – २० नोव्हेंबर 2. २०२१ मध्ये संयुक्त राष्ट्राची हवामान बदलांसंबंधीची परिषद कोणत्या शहरात होत आहे? उत्तर – ग्लासगो 3. तारा सुतारिया आणि अहान यांचा तडप हा चित्रपट लवकरच येणार असून, या चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण करणारा अहान हा कोणत्या अभिनेत्याचा मुलगा आहे? उत्तर – सुनिल शेट्टी 4. खालील पैकी कोणत्या राशीचे चिन्ह हे खेकडा आहे? उत्तर – कर्क 5. कोणत्या देशाचे ऑलिम्पिकच्या इतिहासात सात खेळांमध्ये आतापर्यंत केवळ २ सुवर्णपदक जिंकण्याची कामगिरी केली आहे? उत्तर - फिजी वाचा: वाचा: वाचा:


from Gadget News in Marathi: Computer, Mobile, Auto News in Marathi | Maharashtra Times https://ift.tt/3nDz0bw