Full Width(True/False)

मोठ्या नाकामुळे शाहरुख खानला मिळालं होतं पहिलं काम

मुंबई- बॉलिवूडचा बादशाह असलेला अभिनेता आज २ नोव्हेंबर रोजी त्याचा ५६ वा वाढदिवस साजरा करत आहे. शाहरुखने त्याच्या अभिनयाच्या जोरावर बॉलिवूडमध्ये किंग खानचा दर्जा मिळवला. कधीकाळी ५० रुपये कमावून रस्त्याच्या कडेला झोपणारा शाहरुख आज कोट्यवधींच्या संपत्तीचा मालक आहे. शाहरुखच्या चित्रपटांना प्रेक्षक तोबा गर्दी करतात. शाहरुखने केलेल्या प्रत्येक गोष्टीची चाहत्यांमध्ये चर्चा होते. पण बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनयाचं नाणं खणखणीत वाजवणाऱ्या शाहरुखला त्याचं पहिलं काम त्याच्या मोठ्या नाकामुळे मिळालं होतं. याचा खुलासा स्वतः शाहरुखने एका मुलाखतीत केला होता. १९६५ साली जन्मलेल्या शाहरुखने बॉलिवूडमधील अनेक छोट्या मोठ्या कार्यक्रमात काम केलं. त्यानंतर शाहरुखने चित्रपटामध्ये काम करायचं ठरवलं. शाहरुखला १९९१ साली हेमा मालिनी यांच्या 'दिल आशना है' या चित्रपटात काम करण्याची संधी मिळाली. मात्र या चित्रपटात शाहरुख सहाय्यक अभिनेता होता. एका मुलाखतीत या चित्रपटाबद्दल बोलताना शाहरुखने सांगितलं की, त्याला हा चित्रपट त्याच्या नाकामुळे मिळाला. हेमा मालिनी यांनी चित्रपटाच्या चित्रीकरणादरम्यान शाहरुखला जवळ बोलावून म्हटलं, 'तुझं नाक सगळ्यांपेक्षा वेगळं आहे. या नाकामुळे तुला ही संधी मिळालीये.' शाहरुख म्हणाला की, तो नेहमी त्याचं नाक इतरांपासून लपवत असे. शाहरुखला त्याचं नाव आवडत नसे. मात्र त्याला हे माहीत नव्हतं की जे नाक तो सगळ्यांपासून लपवतोय त्याच नाकामुळे शाहरुखला काम मिळणार आहे. बॉलिवूडमध्ये २५ वर्ष पूर्ण झाल्यावर शाहरुखने लिहिलेल्या 'SRK- २५ इअर्स ऑफ लाइफ' या पुस्तकात शाहरुखने या संपूर्ण घटनांचा उल्लेख केला आहे. मोठ्या नाकामुळे काम मिळालेला शाहरुख आज लाखो प्रेक्षकांच्या मनावर राज्य करतोय यात शंका नाही.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3w9LpXj