Full Width(True/False)

निर्मात्याने घेतला विक्रम गोखलेंसोबत काम न करण्याचा निर्णय

मुंबई- गेल्या अनेक दिवसांपासून अभिनेत्री कंगना रणौतच्या भारताला मिळालेल्या स्वातंत्र्यावरच्या वक्तव्याची चर्चा आहे. सर्वपातळीवरून कंगनाला खडेबोल सुनावले जात असले तरी काहींनी तिच्या वक्तव्याचं समर्थनही केलं होतं. '१९४७ मध्ये मिळालेलं स्वातंत्र हे स्वातंत्र्य नसून भीक होती. २०१४ मध्ये नरेंद्र मोदी यांचं सरकार आल्यानंतर भारतीयांना खऱ्या अर्थाने स्वातंत्र्य मिळालं,' असं वक्तव्य कंगनाने एका मुलाखतीत केलं. कंगनाच्या या विधानावरून बराच वादंग माजला होता. चहूबाजूंनी कंगनावर टीका होत असताना ज्येष्ठ अभिनेते गोखले यांनी कंगनाच्या वक्तव्याचं समर्थन केलं. यानंतर गोखले यांच्यावरही अनेकांनी टीका करायला सुरुवात केली. आता मराठी सिनेनिर्माते यांनी यांच्याशी संबंधीत ट्वीट करत आपलं मत नोंदवलं. यात त्यांनी भविष्यात गोखले यांच्यासोबत कधीही काम करणार नसल्याचं सांगितलं. 'शाळा', 'फँड्री' अशा गाजलेल्या सिनेमांचे निर्माते निलेश नवलाखा यांनी या प्रकरणी ट्वीट करत म्हटलं की, 'मी विक्रम गोखले यांच्यासोबत याआधी काम केलं आहे, कलाकार म्हणून मला त्यांचा प्रचंड अभिमान आहे. परंतु त्यांनी जे बोलली त्याचं समर्थन करणं म्हणजे महामूर्खपणाचं आहे. ते जे काही बोलले त्याचा मनापासून धिक्कार करतो आणि भविष्यात त्यांच्यासोबत काम करणार नसल्याचं मी जाहीर करतो. काय म्हणालेली कंगना रणौत 'सावरकर, राणी लक्ष्मीबाई, नेताजी बोस यांना माहीत होतं की स्वातंत्र्य लढ्यात रक्त वाहणार. पण ते रक्त भारतीयांचं नसावं. तेव्हा मिळालं ती भीक होती. ते स्वातंत्र्य नव्हतं. खरं स्वातंत्र्य २०१४ ला मिळालं.' कंगना समोर उपस्थितांना विचारते, 'स्वातंत्र्य जर भीक म्हणून मिळालं तर तर ते स्वातंत्र्य असेल का?' ८ नोव्हेंबरला कंगना रणौतला सिनेसृष्टीतील योगदानाबद्दल पद्मश्री पुरस्काराने गौरविण्यात आले. यानंतर टाइम्स नाउला दिलेल्या विशेष मुलाखतीत कंगनाने वादग्रस्त विधान केलं. काय म्हणाले विक्रम गोखले रविवारी ब्राह्मण महासंघातर्फे अमृत महोत्सवानिमित्त गोखले यांचा सन्मान करण्यात आला. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना गोखले यांनी राजकीय मुद्द्यांवर भाष्य केले. ते म्हणाले की, 'कंगना जे म्हणाली ते खरं आहे. स्वातंत्र्यासाठी लढणारे वीर फाशीवर जात होते तेव्हा मोठमोठे लोक पाहत राहिले. त्यांना वाचवलं नाही, अशी टिपणीही त्यांनी केली.


from Marathi Bollywood News, Marathi Cinema News https://ift.tt/3cm8vkL